शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

महाविकास आघाडीसमोर तिढा जागावाटपाचा; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:49 AM

आघाडीत जादा जागा मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रयत्न

- नामदेव मोरेनवी मुंबई :  महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांमध्ये जास्तीतजास्त जागा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. जवळपास ११ जागांवर सर्वच घटक पक्षांनी दावा केला असून जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. इतरही अनेक प्रभागांमध्ये मतभेद असून जागावाटप योग्य पद्धतीने झाले नाही, तर बंडखाेरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहरात सभा व कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. परंतु अनेक ठिकाणी एकाच प्रभागामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे व काही ठिकाणी शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. याशिवाय भाजपमधून आघाडीमध्ये येणारांची संख्याही वाढत आहे. दिघामध्ये नीवन गवते यांनी भाजप सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. याच परिसरात राष्ट्रवादीने अन्नू आंग्रे यांना ताकद दिली आहे. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गवते यांच्यावरही टीका केली होती. येथील प्रभाग ३ व ९ मध्ये तिकीटवाटपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. कोपरखैरणेमध्ये माथाडी वसाहत असल्यामुळे तेथे राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या ठिकाणीही काही जागांवर मतभेद होण्याची शक्यता आहे. सानपाडा प्रभाग ७६ मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. परंतु याच ठिकाणी शिवसेनेनेही दावा केला आहे. सीवूड, जुईनगर व इतर काही ठिकाणीही चुरस निर्माण झाली आहे.भाजपमधून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून अनेक नगरसेवक प्रवेश करणार आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आव्हानही आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. काँग्रेसनेही जादा जागांची मागणी केली आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काहींनी अपक्ष तर काहींनी पक्षांतर करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आघाडी करताना जागावाटपाचे व जागावाटप झाल्यानंतर बंडखोरी रोखण्याचे आव्हान आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाnmmcनवी मुंबई महापालिका