Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:14 AM2019-10-18T00:14:02+5:302019-10-18T00:14:08+5:30

Maharashtra Election 2019: चुरशीची लढत : अंतिम टप्प्यातील प्रचार आला रंगात; सभा, बैठकांना वेग

Maharashtra Election 2019: In the campaign, bjp- shiv sena and congress- ncp discusses the sum-minus | Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा

Maharashtra Election 2019: प्रचारात युती, आघाडीकडून बेरीज- वजाबाकीच्याच चर्चा

googlenewsNext

पेण : पेण मतदारसंघात युती विरुद्ध आघाडी अशी चुरशीची लढत पाहावयास मिळणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथील झालेली प्रचारसभा भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या समर्थकांसाठी प्रोत्साहित करणारी ठरली. भाजपमध्ये इनकमिंग वाढले. रवींद्र पाटील यांचे संपूर्ण कुटुंब मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारात सहभागी होऊन जागोजागी चौक सभा, घरोघरी मतदारांशी गाठीभेटी घेत आहे.

एकूणच त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान आ. धैर्यशील पाटील यांचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सतर्क झाले असून आपल्या हक्काचा गडकोट कायमचा आपल्यापाशी राहावा यासाठी नियोजनपूर्वक काम करून परिश्रम घेताना दिसतात. तर धैर्यशील पाटील यांच्या पत्नीही प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. अंतिम टप्प्यातील प्रचाराला पेण मतदारसंघात वेग आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सामना एकतर्फी वाटत होता. मात्र, तो तसा न राहता वातावरण बदलले आहे. आता स्टारप्रचारकांच्या सभा नसल्याने स्थानिक मुद्दे प्रचारात आले आहेत. युती आघाडीचे कार्यकर्तेच आता उर्वरित दोन दिवस आपआपल्या गावात, शहरात, वार्डात, वाडी, वस्त्यांवर जे कार्यकर्ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत झटून कामे करत आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या खात्यात भरभरून मतदान कसे होईल, यासाठी परिश्रम घेत आहेत. शहरी भागात मतदार आपली निवड ओळखून मत देतो तर गावाकडे प्रत्येक पक्षाचा पारंपरिक चाहता वर्ग असतो. ते सर्व सामान्य मतदार पक्षनिष्ठा ठेवून मतदान करतात.

युती व आघाडी उमेदवार एकमेकांना टक्कर देत असताना या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने पारंपरिक काँग्रेस पक्षाच्या हात या निशाणीवर किती मतदान होते, यावर या लढतींचे खरे चित्र अवलंबून आहे. त्याचबरोबरीने एकाच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचा किती स्कोअर होतो, नोटा व इतर राजकीय पक्ष बसप व अपक्ष असे या रणांगणात उभे राहिलेले १२ उमेदवार आहेत. त्यांना किती स्कोअर मिळतो, या सर्व बाबी पाहता एकूण तीन लाख १९ हजार २३८ मतदानापैकी होणारी मतदानाची टक्केवारी, मतदारांचा प्रतिसाद या सर्व बाबींवर उमेदवार व त्यांचे समर्थक बेरीज व वजाबाकीचे गणित जुळवून मॅजिक फिगरची आकडेवारी निश्चित करण्यात मग्न झाले आहेत.

प्रत्येक दिवशी बदलत जाणारे राजकीय वातावरण निर्मिती उमेदवारांची धाकधूक वाढवित आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मतदार कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात, अशा तरंगत्या मतदारांच्या २० टक्के गटाला कोण जिंकला, कोण हरला, याचे देणे-घेणे नाही. अशा मतदारांना रिचार्ज करणे क्रमप्राप्त ठरते. अशाची संख्या आता जागोजागी भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. त्यांची मते निर्णायक ठरू शकतात, यासाठी कार्यकर्ता सतर्क झाले आहेत. हे २० टक्के मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचाराला प्राधान्य

एकंदर ४८ तासांचा अवधी प्रचारदौरा पूर्ण करण्यासाठीची डेटलाइन आहे. तर पुढील ४८ तास मतदारांशी गुप्तगू करण्यासाठीचे आहेत. मतदानाची टक्केवारी वाढल्यास निकाल चमत्कारिक लागणारा ठरेल. मात्र, ज्या बाजूकडे कार्यकर्त्यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे तेच जोरदार लढाई करून बाजी पणाला लावतात. या मतदारसंघात नाही लाट, नाही राष्ट्रवादाचा मुद्दा, आपली भाकरी आपणच कमावली पाहिजे, असा श्रमिक मतदार आहे. ताई, माई, अक्का, विचार करा पक्का या घोषणा ऐकण्याची सवय राहिली नाही. टीव्हीवरच्या बातम्यांमधून राज्यभरात काय चाललेय याची माहिती मतदारांना मिळते. त्यामुळे गाव बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचाराला मतदारसंघात प्राधान्य दिले आहे.

 

Web Title: Maharashtra Election 2019: In the campaign, bjp- shiv sena and congress- ncp discusses the sum-minus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.