बेलापूरचा गड मंदा म्हात्रेंनी राखला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:09 AM2019-10-25T00:09:40+5:302019-10-25T00:10:11+5:30

Maharashtra Election 2019:तब्बल ८७,८५८ मते; प्रतिस्पर्धी अशोक गावडे यांना मिळाली ४३,५९७ मते

Maharashtra Election 2019: The fort of Belapur was maintained by the Manda Mhatre | बेलापूरचा गड मंदा म्हात्रेंनी राखला

बेलापूरचा गड मंदा म्हात्रेंनी राखला

Next

नवी मुंबई : बेलापूरचा गड राखण्यात मंदा म्हात्रे यांना यश आले आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांचा ४३,५९७ मतांनी पराभव केला आहे. त्यांना एकूण ८७,८५८ इतकी मते पडली. विशेष म्हणजे, सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत अटीतटीची झाल्याचे गुरुवारी झालेल्या मतमोजणीतून स्पष्ट झाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक परिवाराने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थितीत राष्ट्रवादीने अशोक गावडे यांना बेलापूरमधून उमेदवारी दिली, तर भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा येथून संधी दिली.

मनसेने गजानन काळे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील आपले अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीपासून बेलापूरमधील लढत मंदा म्हात्रे यांच्यासाठी सोपी मानली जात होती. इतकेच नव्हे, तर त्या मोठ्या फरकाने विजयी होतील, असे अडाखे बांधले जात होते. प्रत्यक्षात मात्र मंदा म्हात्रे यांना अपेक्षित मताधिक्य मिळविता आले नाही. एकूण झालेल्या एक लाख ७४ हजार मतदारांपैकी मंदा म्हात्रे यांना केवळ ८७,८५८ मतांवर समाधान मानावे लागले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना जवळपास ४४ हजार मते पडली. मागील निवडणुकीत केवळ चार हजार मतांचा पल्ला गाठणारे मनसेचे गजानन काळे यांना या वेळी २७,६१८ इतकी मते पडली.

नवी मुंबईमधील एकही ठिकाणी शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचारात उत्साह जाणवला नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी पडद्यामागून राष्ट्रवादीसाठी काम केल्याची शहरात चर्चा होती. या सर्वाचा परिणाम म्हणून मंदा म्हात्रे यांना अपेक्षित मताधिक्यांचा अपेक्षित पल्ला गाठता आला नसल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी आपला गड राखण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांचा जल्लोष

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेतली होती. साधारण तेराव्या फेरीत त्यांनी साधारण २० हजार मतांची लीड घेतली. त्यानंतर मतमोजणी केंद्राच्या परिसरात त्यांच्या समर्थकांची गर्दी जमू लागली, तसेच मंदा म्हात्रे स्वत: मतमोेजणी केंद्रात दाखल झाल्या. परिणामी, परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. दरम्यान, उत्साही कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मतदान केंद्राकडे जाणाºया वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला होता.

Web Title: Maharashtra Election 2019: The fort of Belapur was maintained by the Manda Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.