शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

By नारायण जाधव | Published: February 08, 2024 3:59 PM

नऊ वर्षे उलटले तरी निर्णय कागदावरच : पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

नवी मुंबई : पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण विभागाने सिडको, सेससोबत बैठक घेऊन १२ आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ताजे असतानाच आता हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या राज्य वन्यप्राणी मंडळाने ४ डिसेंबर २०१५ आपल्या दहाव्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र शासनास विसर पडला असल्याचे उघड झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांना मान्यता दिलेल्या निर्णयाचे नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी स्क्रीनशॉट काढून ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून या निर्णयाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या तीन अभयारण्यांचा निर्णय बीएनएचएसने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) साठी सुचवलेल्या शमन (mitigation) उपायांच्या अनुषंगाने घेतल्याचे म्हटले आहे.

तिन्ही पक्षी अभयारण्य कधी विकसित होणार?मुंबई उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२४ रोजी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना सिडको, नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक प्राधिकरण (NMIIA – पूर्वीचे नवी मुंबई सेझ) आणि पर्यावरण कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची २८९ हेक्टर पाणथळ जमिनीच्या वादावर सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी राज्य शासनाने ९ वर्षांपूर्वी घेतलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांचे काय झाले, ते कधी विकसित होणार, असे प्रश्न केले आहेत. तर श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नवी मुंबईतील पाणथळ जागा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या (TCFS) सॅटेलाईट वेटलँड व्यवस्थापन योजनेचा भाग असून वनविभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने त्या तयार केल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबई विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांना धोकानवी मुंबई पाणथळ जागा पक्ष्यांचे अधिवास ठिकाण म्हणून राखण्याच्या महत्त्वावर बीएनएचएसने वारंवार भर दिला आहे. पक्ष्यांना जर त्यांना त्यांची सवय असलेली ओलसर जागा दिसली नाही तर हजारोंच्या संख्येने येणारे पक्षी विमानतळ परिसरात उतरतील. त्यामुळे ये-जा करणाऱ्या विमानांना त्यांचा फटका बसून धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई