‘घारापुरी‘ची महाराष्ट्र प्रदूषण मंडळ करणार पाहणी

By admin | Published: January 3, 2017 05:44 AM2017-01-03T05:44:49+5:302017-01-03T05:44:49+5:30

घारापुरी बेटावर होत असलेल्या वाढत्या प्रदूषणाबाबत शिवसेना विभाग प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदूषण

Maharashtra Pollution Board examines 'Gharapuri' | ‘घारापुरी‘ची महाराष्ट्र प्रदूषण मंडळ करणार पाहणी

‘घारापुरी‘ची महाराष्ट्र प्रदूषण मंडळ करणार पाहणी

Next

उरण : घारापुरी बेटावर होत असलेल्या वाढत्या प्रदूषणाबाबत शिवसेना विभाग प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. येत्या महिन्यात जेएनपीटी बंदरासंदर्भात जनसुनावणीत या विषयाला प्राधान्याने अग्रक्रम देवून येत्या आठवड्यात बेटाची पाहणीही करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांनी दिली.
घारापुरी बेटाची होणारी धूप, समुद्रातून वाहत येणारा कचरा आणि समुद्रात सोडले जाणारे तेल यामुळे घारापुरी बेटावर पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यानंतरही कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे बेटावरील पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. याकडेही बळीराम ठाकूर यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांचीही भेट घेवून चर्चा केली. या चर्चेत घारापुरी बेटावरील वाढत्या प्रदूषणाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर येत्या २३ जानेवारी रोजी जेएनपीटीच्या बहुउद्देशीय सभागृहात जनसुनावणी आयोजित केली आहे. या जनसुनावणीमध्ये या विषयाला प्राधान्याने अग्रक्रम देवून चर्चा केली जाईल. तसेच येत्या आठवड्यात बेटाची पाहणीही क रण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांनी दिली.
जेएनपीटीकडे प्रमुख मागण्या
जागतिक दर्जाचे बेट जेएनपीटी दत्तक घेवून पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. बेटावर संरक्षित भिंत बांधण्याच्या कामाचे केलेले उद्घाटनाच्या कामाची अंमलबजावणी करण्यात यावी. बेटाच्या स्वच्छतेसाठी समुद्र किनाऱ्यावर येणारा कचरा उचलण्याचे काम स्थानिक ट्रस्ट किंवा सामाजिक संस्थेकडे सोपविण्यात यावे, स्थानिकांबरोबरच उरण, पनवेल, नवी मुंबई भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी दळणवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी, स्थानिक मच्छिमारांना आर्थिक नुकसान भरपाई आणि मच्छिमारांना ओळखपत्रे देण्यात यावीत, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, खोली वाढविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे नुकसान झालेल्या घरांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, बेटावर बसविण्यात आलेल्या सिग्नलची देखभाल करण्याचे काम स्थानिकांना मिळावे, अशा अनेक मागण्या शिवसेना विभाग प्रमुख आणि ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी जेएनपीटी अध्यक्षांकडे केली तक्रारीतून आहे. (वार्ताहर)

Web Title: Maharashtra Pollution Board examines 'Gharapuri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.