नवी मुंबई : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्याचे संकेत शिवसेना नेत्यांनी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. शहरप्रमुखांसह काही पदाधिकाºयांनी राजीनामा दिला असून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे.नवी मुंबईमधील एक मतदारसंघ शिवेसेनेला सोडण्यात यावा, अशी मागणी येथील पदाधिकाºयांनी केली होती. बेलापूर मतदारसंघामधन उपनेते विजय नाहटा यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख व इतर महत्त्वाचे पदाधिकारी मातोश्रीवर तळ ठोकून होते. सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईमधील पदाधिकाºयाांी चर्चा केली. आपण नवी मुंबईमधील जागांसाठी शेवटपर्यंत आग्रही आहोत. परंतु आपल्या मनासारखे झाले नाही. तरीही पक्षाच्या आदेशाप्रमणे युतीचे काम करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदासंघ भाजपला देण्यात आल्याचे स्पष्ट संकेत कार्यकर्त्यांना मिळाले आहेत. शहरातील एकही मतदारसंघ न मिळाल्यामुळे शिवसेना पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये पदाधिकाºयांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. शहरप्रमुख विजय माने व इतर पदाधिकाºयांनी पदाचा राजीनामा दिला आहे. बेलापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.युती झाली तर एक मतदारसंघ मिळावा, याासाठी शिवसेना पदाधिकाºयांनी मोर्चेबांधणी केली होती. शिष्टमंडळाने यापूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून बेलापूर मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. परंतु एकही मतदारसंघ न मिळाल्याने पदाधिकाºयांचा भ्रमनिरास झाला.पदाधिकारी दिवसभर बाहेर नवी मुंबईमधील अनेक पदाधिकारी सोमवारी दिवसभ मातोश्रीबाहेर तळ ठोकून होते. सायंकाळी प्रमुख पदाधिकाºयांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्यानंतर प्रमुख पदाधिकाºयांनी नाराज होऊन नवी मुंबईत आले, परंतु अनेक कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत मातोश्रीबाहेर तळ ठोकून बसले होते.नवी मुंबईतील किमान एक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी आम्ही आग्रही होतो व अजून आग्रही आहोत, परंतु युतीमध्ये दोन्ही मतदारसंघ भाजपला जाण्याचे संकेत नेतृत्वाने दिले आहेत. भाजपला मतदारसंघ गेल्यास आम्ही युतीधर्माचे पालन करू. कार्यकर्त्यांनीही राजीनामा देऊ नये किंवा बंडखोरी करू नये, असे आवाहन मी करतो.- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख बेलापूरनवी मुंबई शिवसेनेने संघटनात्मक बांधणी केली होती. दोन्ही मतदारसंघ भाजपला दिले जाणार असल्याने मी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. बेलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.- विजय माने,शहर प्रमुख शिवसेना
Vidhan sabha 2019 : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघही भाजपला, नवी मुंबईतील शिवसैनिकांचा झाला भ्रमनिरास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:27 AM