नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, यंदा विधानसभेसाठी मनसेकडूनही उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार नवी मुंबईतले दोन्ही मतदारसंघात मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.राज्यात २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार मनसेकडून देखील उमेदवार रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तशी भावना देखील राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांची होती. याकरिता जिल्हानिहाय मनसेच्या कार्यालयांमधून प्रत्येक विधानसभेतील इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही़ मात्र राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून जाहिर सभा घेतल्या होत्या़ सभांमध्ये राज यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही राज यांनी मतदारांना केले होते़ त्यावेळी राज यांच्या सभेची चांगलीच चर्चा रंगली होती़ लाव रे तो व्हीडिओ ही राज यांची सभेतील शैली चांगलीच गाजली होती़ तरीही मतदारांनी भाजपला कौल दिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक मनसेने लढवणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती़ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मनसे सहभाी होणार, अशीही चर्चा होती़ मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेणार नसल्याचे जाहीर केले़ त्यामुळे मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार की नाही, यावर चर्चा सुरू झाली़
Vidhan Sabha 2019: मनसे नवी मुंबईतही देणार उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:45 AM