पनवेलमध्ये नथुराम गोडसे झिंदाबादच्या घोषणा
By वैभव गायकर | Updated: November 15, 2022 19:03 IST2022-11-15T19:02:32+5:302022-11-15T19:03:07+5:30
करणी सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पनवेलमध्ये नथुराम गोडसे झिंदाबादच्या घोषणा
लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्येमहात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर त्या कार्यक्रमात 'गोडसे झिंदाबाद'च्या घोषणाही देण्यात आल्या. महाराष्ट्रात करणी सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांच्या माध्यमातून शहरातील पृथ्वी हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नारायण आपटेंना देखील मानवंदना वाहण्यात आली. अजय सिंग सेंगर यांच्या मार्फत 2008 पासून पनवेल मध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो. याच वादग्रस्त कार्यक्रमाचा मुद्दा देशाच्या संसदेतदेखील एकेकाळी गाजला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा आमच्यासाठी राष्ट्रपिता असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांनी या कार्यक्रमात केले होते. यावेळी नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत गोडसेच्या नावाचा उदो उदो करणाऱ्या आणि महात्मा गांधी यांच्या विरोधातील घोषणा देण्यात आल्या.