पनवेल: पनवेल मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकाना पालिकेने जप्तीच्या नोटिसा बजावन्यास सुरुवात केली आहे.याविरोधात शहरातील गांधी उद्यान येथे दि.19 रोजी महापालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात हि निदर्शन करण्यात आली.यावेळी सेनेचे शिरीष घरत,बबन पाटील,माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम पाटील,कॉग्रेस चे सुदाम पाटील,देवेंद्र मढवी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मालमत्ता करप्रणाली लागु करणारे भाजप व पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलन कर्त्यांची उपायुक्त गणेश शेटे आणि विठ्ठल डाके यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शासन स्तरावर याबाबत आपण पाठपुरावा करावा असे शेट्टे यांनी आंदोलनकर्त्यांना सुचवले. आयुक्त गणेश देशमुख सुट्टीवर असल्याने आयुक्त आल्यावर याबाबत आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा करू असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले.तसेच महाविकास आघाडीचे निवेदन पालिकेच्या शिष्टमंडला सुपूर्द केले.