महेंद्र दळवी यांच्यावर गुन्हा दाखल
By admin | Published: January 11, 2017 06:13 AM2017-01-11T06:13:38+5:302017-01-11T06:13:38+5:30
म्हसळा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापरिषद सदस्य महेंद्र दळवी यांच्या विरोधात
श्रीवधन : म्हसळा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापरिषद सदस्य महेंद्र दळवी यांच्या विरोधात म्हसळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी डॉ. सुहास काशिनाथ मोरे (२९, सध्या रा. खामगाव, ता. म्हसळा मूळ-नागपूर ) हे खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. २९ डिसेंबर २०१६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोन वरु न महेंद्र दळवी यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात ५ जानेवारीला केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल के ला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. सुखदेवे करीत आहेत.
म्हसळा तालुक्यातील सरकारी डॉक्टर हे सकाळी ९ वाजल्यापासून बारमध्ये जाऊन दारूचे सेवन करत असतात. सरकारी दवाखान्यात आलेल्या रु ग्णांना योग्य सुविधा मिळत नसून या उलट त्यांच्याकडून शासनाने दिलेल्या मोफत सुविधेऐवजी पैसे घेतले जातात. अशा अनेक तक्रारी तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांनी के ल्या होत्या. या तक्रारींचा जाब विचारण्याकरिता फोन केला असता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरेरावीच्या भाषेत उत्तर दिल्याचे महेंद्र दळवी यांनी सांगितले. याबाबत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन तक्र ार करणार असल्याचे महेंद्र दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)