लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रत्येक प्रभागातून नगरसेविकांनी अर्ज भरले. त्यामुळे पहिल्यांदाच सर्वच प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष या महिला असणार आहेत. पुरेशी संख्या नसतानाही शिवसेनेच्या कृपेने ‘अ’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी मनसेच्या सुनंदा कोट यांनी अर्ज दाखल केला आहे. याची माहिती महापालिकेतील विरोधीपक्षनेते व मनसेचे पदाधिकारी मंदार हळबे आणि गटनेते प्रकाश भोईर यांना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आगामी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची ही जळवाजळव आहे का?, अशी माहापिलका निवडणुकीत रंगली आहे.केडीएमसी क्षेत्रातील १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणुक ५ जुलैला होणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या वेळी शिवसेनेने सहयोगी नगरसेविकांना प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी संधी दिली. मनसेच्या सुनंदा कोट यांना सूचक आणि अनुमोदन देताना ‘ब’ प्रभागासाठी शिवसेनेच्या मनीषा तारे, ‘ह’ प्रभाग रेखा म्हात्रे ‘क’ प्रभाग समितीसाठी एमआयएमच्या शकीला खान, ‘आय’ प्रभागासाठी बसपाच्या सोनी अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली. ‘जे’ प्रभाग समितीचे अध्यक्षपदासाठी सुमन निकम, ‘ड’ प्रभाग हेमलता पावशे, ‘फ’ प्रभाग खुशबू चौधरी, ‘ग’ प्रभाग अलका म्हात्रे तर ‘इ’ प्रभाग दमयंती वझे यांना भाजपाने उमेदवारी दिली. दरम्यान, प्रत्येक प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सर्व महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र याची औपचारिक घोषणा ५ जुलैला विशेष महासभेत होईल.
प्रभाग समित्यांवर येणार ‘महिलाराज’
By admin | Published: July 01, 2017 7:29 AM