चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; एनएमएमटी बसला पुन्हा आग

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 4, 2023 11:35 PM2023-10-04T23:35:52+5:302023-10-04T23:38:11+5:30

नेरुळमध्ये घडली घटना

major accident was avoided due to driver vigilance nmmt bus caught fire again | चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; एनएमएमटी बसला पुन्हा आग

चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; एनएमएमटी बसला पुन्हा आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : धावती बस पेट घेत असतानाच बस चालक व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच आग आटोक्यात येऊन मोठी दुर्घटना टळली. बुधवारी रात्री  जेएनपीटीला जाणारी एमएमएमटीची इलेक्ट्रिक बस नेरूळमध्ये आली असता पुढच्या चाकाखालून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनात आल्याने बस थांबवण्यात आली. त्याचवेळी वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन सुमारे 20 प्रवास्यांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले.

दोन दिवसांपूर्वीच ऐरोलीत धावत्या एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एका एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बसला आग लागत असतानाच ती आटोक्यात आणण्यात आली. जेएनपीटीला जाणारी 34 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस नेरुळ पुलाखाली आली असता बसच्या पुढच्या भागातून धूर निघत होता. हा प्रकार बस चालक किरण कणसे यांच्या नजरेस पडले. यामुळे त्यांनी तातडीने बस रस्त्यालगत घेतली. त्याचवेळी सदर ठिकाणी तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत धरणे व सहकारी पोळ, भोसले, घोरपडे, काचगुंडे वाहतूक नियंत्रित करत होते. बसमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतसोबत असलेल्या अग्निरोधकाचा वापर करून आग आटोक्यात आणली. शिवाय बसमधील प्रवास्यांना देखील तातडीने बसमधून खाली उतरवण्यात आले. बस चालकाच्या सतर्कतेमुळे व वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे एनएमएमटी बसची मोठी दुर्घटना टळली. मागील काही महिन्यात एनएमएमटी बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: major accident was avoided due to driver vigilance nmmt bus caught fire again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग