नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; चार कंपन्यांचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 06:37 PM2022-05-06T18:37:09+5:302022-05-06T18:39:22+5:30

एका कंपनीला लागलेली आग आणखी तीन कंपन्यांपर्यंत पसरली; अग्निशमन दल घटनास्थळी

Major fire breaks out at chemical company in Navi Mumbais Pawne MIDC Area | नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; चार कंपन्यांचं मोठं नुकसान

नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; चार कंपन्यांचं मोठं नुकसान

Next

नवी मुंबई: नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीनं रौद्ररुप धारण केलं आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

पावणे एमआयडीसीतल्या वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या रासायनिक कंपनीला दुपारी आग लागली. वेस्ट क्लाय पॉलिकॅबला लागलेली आग पुढे तीन कंपन्यांपर्यंत पसरली. या आगीत चार कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अग्निशमन दलानं या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. कंपनीत होणाऱ्या छोट्या छोट्या स्फोटांमुळे आग अधिकच भडकत आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Web Title: Major fire breaks out at chemical company in Navi Mumbais Pawne MIDC Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.