मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

By नामदेव मोरे | Published: January 11, 2024 07:01 PM2024-01-11T19:01:54+5:302024-01-11T19:03:10+5:30

मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे.

Makar Sankranti increased arrivals of millet groundnut along with sesame jaggery Sale of 88 tonnes of sesame seeds in four days | मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

नवी मुंबई: मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे. चार दिवसामध्ये तब्बल ८८ टन तीळाची विक्री झाली आहे. २०८ टन गुळ व ६२६ टन शेंगदाण्याची विक्री झाली आहे. हिवाळा सुरू झाला की ग्राहकांकडून बाजरीला मागणी वाढती. मकर संक्रातीला बाजरीची भाकरी व गाजर, वाटाणा, वालाच्या शेंगाची उसळ केली जाते. यावर्षी बाजरीचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. एक महिन्यापुर्वी बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्यस्थितीमध्ये २७ ते ३७ रुपये किलो दराने विक्री होत आहे. या आठवड्यात चार दिवसात ३३० टन बाजरीची विक्री झाली आहे.

तीळ व शेंगदाण्याचे लाडूही संक्रातीच्या दिवशी वाटले जातात. यामुळे या वस्तूंची मागणीही वाढली आहे.बाजार समितीमध्ये तीळ १४० ते २०० रुपये किलो, गुळ ४७ ते ५५ रुपये व शेंगदाणे ९० ते १३६ रुपये किलो दराने विकले जात आहेत. संक्रातीमुळे या चारही वस्तूंना मागणी वाढली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तीळ व गुळाचे दर स्थिर असून बाजरी व शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

संक्रातीमुळे चाद दिवसातील आवक व बाजारभाव
वस्तू - आवक - बाजारभाव
तीळ - ८८.२ - १४० ते २००
गुळ - २०८ - ४७ ते ५५
शेंगदाणे - ६२६ - ९० ते १३६
बाजरी - २७ ते ३७

Web Title: Makar Sankranti increased arrivals of millet groundnut along with sesame jaggery Sale of 88 tonnes of sesame seeds in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.