नवी मुंबई: मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे. चार दिवसामध्ये तब्बल ८८ टन तीळाची विक्री झाली आहे. २०८ टन गुळ व ६२६ टन शेंगदाण्याची विक्री झाली आहे. हिवाळा सुरू झाला की ग्राहकांकडून बाजरीला मागणी वाढती. मकर संक्रातीला बाजरीची भाकरी व गाजर, वाटाणा, वालाच्या शेंगाची उसळ केली जाते. यावर्षी बाजरीचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. एक महिन्यापुर्वी बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती. सद्यस्थितीमध्ये २७ ते ३७ रुपये किलो दराने विक्री होत आहे. या आठवड्यात चार दिवसात ३३० टन बाजरीची विक्री झाली आहे.
तीळ व शेंगदाण्याचे लाडूही संक्रातीच्या दिवशी वाटले जातात. यामुळे या वस्तूंची मागणीही वाढली आहे.बाजार समितीमध्ये तीळ १४० ते २०० रुपये किलो, गुळ ४७ ते ५५ रुपये व शेंगदाणे ९० ते १३६ रुपये किलो दराने विकले जात आहेत. संक्रातीमुळे या चारही वस्तूंना मागणी वाढली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तीळ व गुळाचे दर स्थिर असून बाजरी व शेंगदाण्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
संक्रातीमुळे चाद दिवसातील आवक व बाजारभाववस्तू - आवक - बाजारभावतीळ - ८८.२ - १४० ते २००गुळ - २०८ - ४७ ते ५५शेंगदाणे - ६२६ - ९० ते १३६बाजरी - २७ ते ३७