मलनि:सारण वाहिनीतील पाणी खाडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:14 AM2019-07-17T00:14:21+5:302019-07-17T00:14:40+5:30
नेरुळ सेक्टर २ मधील स्मशानभूमीजवळ महापालिकेने टाकलेली मलवाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून फुटलेली आहे.
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २ मधील स्मशानभूमीजवळ महापालिकेने टाकलेली मलवाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून फुटलेली आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न होता खाडीत जात आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने खाडीच्या बाजूला राहणाऱ्या सेक्टर ४ मधील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
नवी मुंबई शहरातील मलवाहिन्यांचे सांडपाणी मलनि:सारण केंद्रात सोडण्यात येते. या सांडपाण्यावर एरिएटर यंत्राच्या साहाय्याने प्रक्रि या केल्यानंतर ते पाणी खाडीत सोडले जाते. शहरातील विविध नोडमध्ये मलनि:सारण केंद्रे बनविण्यात आली असून मलनिस्सारण वाहिन्यांच्या माध्यमातून सांडपाणी मलनि:सारण केंद्रात सोडण्यात येते. नेरु ळ सेक्टर २ मधील मलनि:सारण केंद्रात नेरु ळमधील विविध सेक्टरमधून येणाºया सांडपाण्यावर प्रक्रि या केली जाते. या मलनिस्सायण केंद्रात येणारी नेरु ळ सेक्टर ४ येथील मलनिस्सारण वाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून फुटली आहे. यामुळे मलमिश्रित सांडपाणी खाडीत जात असून या परिसरात राहणाºया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे फुटलेल्या मलवाहिनीपासून हाकेच्या अंतरावर महापालिकेच्या शाळेत नेरु ळ विभाग कार्यालय असून महापालिका अधिकाऱ्यांचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.
फुटलेल्या मलवाहिनीमुळे परिसरात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याच नेरु ळ विभाग कार्यालय असून देखील महापालिका अधिकाºयांचे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती येथील नागरिक नरेश भोईर यांनी दिली.
>नेरु ळ विभागातील कार्यकारी अभियंत्यांना याबाबत माहिती देऊन सदर समस्येवर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.
- सुरेंद्र पाटील,
शहर अभियंता, न.मुं.म.पा.