नवी मुंबई/मालेगाव (जि. नाशिक) : नवी मुंबईतील बडोदा बँकेवरील दरोड्यातील सोने विकत घेणा-या येथील सराफास पोलिसांनी अटक केली असून अर्धा किलो सोने जप्त केले आहे. जुईनगर येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकून लुटलेल्या काही सोन्याची विक्री मालेगावी करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले. नवी मुंबई येथील सानपाडा पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपींनी विक्री केलेले अर्धा किलो सोने येथील संगमेश्वर भागातील राजेंद्र जे. वाघ (५२) या सराफ व्यावसायिकाकडून जप्त केले आहे. पोलिसांनी वाघ यास अटक केली.जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याच्या घटनेचा तपास पोलिसांकडून अंतिम टप्प्यात पोचला आहे. तपासाची चक्रे फिरवित पोलिसांनी आठ दिवसांच्या कालावधीत चार संशयितांना अटक केली होती. बँक लुटण्यासाठी मुख्य आरोपींना गुन्ह्यात मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यातील एका संशयित आरोपीने मालेगावमधील आयेशानगर, आझादनगर, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोने विकल्याची माहिती सानपाडा पोलिसांना मिळाली होती.वाघकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हावडा येथून मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतल्याचेही समजते. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत उलगडा होऊ शकलेला नाही.>ठोस पुरावे पोलिसांच्या हातीबडोदा बँक लुटणाºया टोळीने यापूर्वी देखील गुन्हे केले असून, त्या गुन्ह्यांमधील चोरीचा ऐवज ते मालेगावमधील सोनारांना विकायचे, असेही समजते. तसे ठोस पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.
मालेगावला सराफास अटक, अर्धा किलो सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 5:17 AM