पनेवलमध्ये आजपासून मल्हार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:30 AM2018-01-20T02:30:12+5:302018-01-20T02:30:12+5:30

‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे

Malhar festival from Panvel today | पनेवलमध्ये आजपासून मल्हार महोत्सव

पनेवलमध्ये आजपासून मल्हार महोत्सव

Next

पनवेल : ‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणाºया महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतील सभागृहनेते परेश ठाकूर व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष अरु ण भगत यांनी केले आहे.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १०व्या मल्हार महोत्सवाच्या नियोजनासंदर्भातील माहिती देण्यासाठी नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भाजपाचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष व महोत्सवप्रमुख जयंत पगडे उपस्थित होते.
विविध राज्यांतील संस्कृती, मनोरंजन, कलाविष्काराची पर्वणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवार, २० जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी उपमहापौर चारुशीला घरत व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी उपस्थित राहणार आहेत.
मराठी अभिनेत्री ‘माझ्या नवºयाची बायको’फेम अनिता दातार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. रविवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान योजनेअंतर्गत ‘स्वच्छ, सुंदर सोसायटी’ स्पर्धेची घोषणा करणार आहेत. तर २४ जानेवारीला महोत्सवाचा समारोप होणार असून राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया गुणिजनांचा (व्यक्ती व संस्था) पनवेल गौरव व रायगड गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सुकाणू, स्वागत, सांस्कृतिक, साहित्य, निमंत्रण, बक्षीस वितरण अशा विविध समित्या कार्यरत असून, विविध संस्कृती, कला-आविष्कारांची पर्वणी असलेल्या या महोत्सवास नागरिकांनी अवश्य भेट देऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन या वेळी आयोजकांच्या वतीने करण्यात
आले.

Web Title: Malhar festival from Panvel today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.