शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

पनेवलमध्ये आजपासून मल्हार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:30 AM

‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे

पनवेल : ‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणाºया महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतील सभागृहनेते परेश ठाकूर व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष अरु ण भगत यांनी केले आहे.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १०व्या मल्हार महोत्सवाच्या नियोजनासंदर्भातील माहिती देण्यासाठी नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भाजपाचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष व महोत्सवप्रमुख जयंत पगडे उपस्थित होते.विविध राज्यांतील संस्कृती, मनोरंजन, कलाविष्काराची पर्वणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवार, २० जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी उपमहापौर चारुशीला घरत व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी उपस्थित राहणार आहेत.मराठी अभिनेत्री ‘माझ्या नवºयाची बायको’फेम अनिता दातार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. रविवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान योजनेअंतर्गत ‘स्वच्छ, सुंदर सोसायटी’ स्पर्धेची घोषणा करणार आहेत. तर २४ जानेवारीला महोत्सवाचा समारोप होणार असून राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया गुणिजनांचा (व्यक्ती व संस्था) पनवेल गौरव व रायगड गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सुकाणू, स्वागत, सांस्कृतिक, साहित्य, निमंत्रण, बक्षीस वितरण अशा विविध समित्या कार्यरत असून, विविध संस्कृती, कला-आविष्कारांची पर्वणी असलेल्या या महोत्सवास नागरिकांनी अवश्य भेट देऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन या वेळी आयोजकांच्या वतीने करण्यातआले.