ममता केनियातच : मोलीना कुलकर्णीने दिली पोलिसांना माहिती
By admin | Published: July 11, 2016 11:00 PM2016-07-11T23:00:51+5:302016-07-11T23:22:20+5:30
आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही केनियातच असून तिचा कधीतरी आपल्याला फोन येत असतो
जितेंद्र कालेकर
ठाणे : आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही केनियातच असून तिचा कधीतरी आपल्याला फोन येत असतो. मात्र तिचा कोणता आणि कसला उद्योग आहे, याची कोणतीच माहिती नसल्याचे ममताची बहिण मोलीना मुकूंद कुलकर्णी (49) हिने ठाणे पोलिसांना सोमवारी नोंदविलेल्या जबाबात म्हटले आहे.
अडीच हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणी ममता कुलकर्णी ही 14 क्रमांकाची आरोपी आहे. याप्रकरणी तिचा पती विकी गोस्वामीसह सात जणांचा ठाणो पोलीस शोध घेत आहेत. सोमवारी काही सुरक्षा रक्षकांसह मीरा रोड येथे राहणारी ममताची मोठी बहिण मोलीना हिचाही अमली पदार्थ विरोधी पथकाने जबाब नोंदविला. तिला मंगळवारी जबाब नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. परंतू, मंगळवारी साई बाबांचे नामस्मरण करण्याचा दिवस असल्यामुळे आपण सोमवारीच आल्याचेही तिने सांगितले. वडील मुकूंद कुलकर्णी हे मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ अधिकारी होते. त्यांनीच काही रक्कम आपल्याला दिल्याने त्याच रकमेच्या व्याजावर आपला चरितार्थ भागविते. वडीलांचे 2009 मध्येच निधन झाले.
(ममता कुलकर्णीने दिले व्यवसायासाठी २ कोटी)
याव्यतितिरिक्त ममता सध्या केनियात असते. कधीतरी तिचा फोन येत असतो. मात्र, विकी गोस्वामी किंवा इतर कोणाबाबतही आपल्याला काहीच माहिती नाही.याशिवाय, कोणी कोणाला इफेड्रीनची तस्करी केली, याचीही काहीच माहिती नसल्याचा दावा तिने केला. उशिर झालेला असल्यामुळे तिला पुन्हा जबाबासाठी बोलविण्यात येणार असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिका:याने लोकमतला सांगितले.
आणखी वाचा
ड्रग्जच्या रॅकेटमागे ममता कुलकर्णी!
ममता कुलकर्णीला फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरची चौकशी
ममता कुलकर्णी ही आपली पत्नी नाही - विकी गोस्वामी