आलिशान हॉटेलात २ रुम घेऊन मुक्काम; ८ महिन्यांनी उघडलं दार, समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 01:18 PM2021-09-02T13:18:11+5:302021-09-02T13:18:28+5:30

खारघरमधील थ्री स्टार हॉटेलमध्ये एका व्यक्तीचा ८ महिन्यांपासून मुक्काम

Man occupies 2 rooms in hotel for 8 months escapes through bathroom window without paying Rs 25 lakh bill | आलिशान हॉटेलात २ रुम घेऊन मुक्काम; ८ महिन्यांनी उघडलं दार, समोर आला धक्कादायक प्रकार

आलिशान हॉटेलात २ रुम घेऊन मुक्काम; ८ महिन्यांनी उघडलं दार, समोर आला धक्कादायक प्रकार

googlenewsNext

नवी मुंबई: आठ महिन्यांपासून थ्री स्टार हॉटेलमध्ये मुक्काम केलेल्या एका व्यक्तीनं बिल न देता पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतल्या अंधेरीचा रहिवासी असलेला मुरली कामत खारघरमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये राहत होता. त्याच्यासोबत त्याचा मुलगादेखील तिथेच वास्तव्यास होता. मुरली कामतनं दोन आलिशान रुम बुक केल्या होत्या. मात्र बिल न देताच तो फरार झाला. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानं पोलीस तक्रार दाखल केली.

मूळचा अंधेरीचा रहिवासी असलेला मुरली कामत त्याच्या १२ वर्षांच्या मुलासह खारघरमधील थ्री स्टार हॉटेलमध्ये राहत होता. आठ महिन्यांपासून त्याचा हॉटेलमध्ये मुक्काम होता. २३ नोव्हेंबरला मुरली कामत मुलाला घेऊन हॉटेलमध्ये आला. आपण चित्रपटसृष्टीत काम करत असल्याचं सांगत त्यानं दोन सुपर डिलक्स रुम बुक केले. यातली एक खोली मुक्कामासाठी, तर दुसरी व्यवसायिक बैठकांसाठी घेण्यात आली होती. 

एका महिन्यानंतर अनामत रक्कम भरू असं मुरली कामतनं सांगितलं होतं. त्यानं त्याचा पासपोर्ट हॉटेलकडे जमा केला होता. मेपर्यंत कामतनं पैसे दिले नव्हते. १७ जुलैला हॉटेल कर्मचाऱ्यांनी कामत राहत असलेल्या खोलीचं दार उघडलं. त्यावेळी कामत आणि त्याचा मुलगा बाथरूमच्या खिडकीतून पळून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. कामतनं त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल हॉटेलमध्ये ठेवून पळ काढला. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनानं कामत विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Man occupies 2 rooms in hotel for 8 months escapes through bathroom window without paying Rs 25 lakh bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.