नवी मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील कुरबूर अनेकदा समोर आल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे या दोघांमधील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. गणेश नाईक मतदारसंघातील कामे करत नाही. आता मला सीमोल्लंघन करावेच लागेल, अशा थेट इशाराच आता मंदा म्हात्रे यांनी भाजपला दिला आहे. (manda mhatre alleged that ganesh naik is not working in his constituency)
ठरलं! CM उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार; अमित शहांची घेणार भेट, चर्चांना उधाण
भाजपच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत स्वपक्षीय गणेश नाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नवी मुंबईतील दोन्ही भाजपा आमदारांमधील विस्तव गेल्या काही वर्षापासून जाता जाईना झाला आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही मंदा म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर या दोघांच्या वादाला पुन्हा सुरुवात झाली असून, ती धुसफूस पुन्हा एकदा टोक गाठताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण
आता मला सीमोल्लंघन करावेच लागेल
ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक हे त्यांच्या मतदारसंघांमध्ये काम करत नाहीत. त्यामुळे मला आता सीमोल्लंघन करुन नाईकांच्या मतदारसंघात जावे लागणार आणि सर्वसामान्यांची कामे करावी लागणार, अशी खोचक टीका मंदा म्हात्रे यांनी केली. ऐरोली विधानसभेत जाऊन आगरी-कोळी लोकांसाठी खाडीकिनारी जेट्टी उभारणार असून, इतरही काम हाती घेतल्याचे यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर केले.
“अजितदादांना शरद पवारांमुळेच राजकारणात संधी, ते मोठे नेते नाहीत”; भाजपचा टोला
स्वपक्षाकडूनच महिलांना डावलले जाते
राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. लोकमतच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटले गेले. दुसऱ्यांदाही निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझे काम होते, माझे कर्तृत्त्व होते. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे प्रकार होतात. मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात. मात्र, आपण कधीही स्वतःला कमी समजू नये, असे मंदा म्हात्रे यांनी म्हटले होते.
“काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”
दरम्यान, या सगळ्यावर गणेश नाईक काय उत्तर देतात आणि मंदा म्हात्रे खरोखरच ऐरोली मतदारसंघात जाऊन काम करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याच सगळ्या वादाचा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार याबाबतच राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.