Mango: जुन्नरचा हापूस आला हाे आला..., महिनाभराआधीच बाजार समितीमध्ये आवक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 01:41 PM2023-04-19T13:41:06+5:302023-04-19T13:41:22+5:30

Mango: कोकणच्या हापूस प्रमाणे जुन्नरचा हापूस आंबाही एक महिना आधीच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुहूर्ताची पेटी दाखल झाली असून जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. 

Mango: Junnar's hapus ala ha ala..., inflows started in the market committee before a month | Mango: जुन्नरचा हापूस आला हाे आला..., महिनाभराआधीच बाजार समितीमध्ये आवक सुरू

Mango: जुन्नरचा हापूस आला हाे आला..., महिनाभराआधीच बाजार समितीमध्ये आवक सुरू

googlenewsNext

नवी मुंबई : कोकणच्या हापूस प्रमाणे जुन्नरचा हापूस आंबाही एक महिना आधीच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुहूर्ताची पेटी दाखल झाली असून जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे.

प्रत्येक वर्षी मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जुन्नरचा हापूस मार्केटमध्ये दाखल होत असतो. यावर्षी काही भागात लवकर पीक आले असून मंगळवारी आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठविण्यात आला. जुन्नरच्या पश्चिम भागात आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. या आंब्याला शेकडो वर्षांची परंपरा असून त्याला भौगोलिक मानांकन प्राप्त व्हावे यासाठीही शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवनेरी हापूस या नावाने ओळख मिळविण्याचा प्रयत्न आहे. 

बाजार समितीमध्ये दोन डझनचे चार बॉक्स पहिल्या दिवशी आले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला या आंब्याची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली. या आंब्याला किती भाव मिळणार याकडे मार्केटचे लक्ष लागले असून साधारणत: ८०० ते ९०० रुपये डझन भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

प्रशासकीय पातळीवर परिस्थिती पूर्वपदावर
मंगळवारी प्रशासकीय पातळीवर परिस्थिती पूर्वपदावर आली. पालिकेचे तसेच महसूल विभागाचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनीदेखील नियोजनात विशेष मेहनत घेतली. घटनेतील मयत मृतदेह त्यांच्या नातेवाइकांपर्यंत ॲम्ब्युलन्समध्ये पोहोचविण्याची व्यवस्था तळेकर यांनी केली.

Web Title: Mango: Junnar's hapus ala ha ala..., inflows started in the market committee before a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.