दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

By नामदेव मोरे | Published: April 14, 2023 06:18 AM2023-04-14T06:18:12+5:302023-04-14T06:18:29+5:30

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे.

mangoes from south are in full demand in APMC arrival of Hapus from Konkan has decreased | दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

googlenewsNext

नवी मुंबई :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बदामी, लालबाग, तोतापुरी, गोळा आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. पुढील एक महिना  कोकणपेक्षा दक्षिणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मुंबई कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कोकणातून २६२९३ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमधून ४५०७० पेट्यांची आवक झाली आहे. कोकणातून ६०४ टन व दक्षिणेकडून ७८५ टन आंब्याची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरातून एप्रिल महिन्यात आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यातही अपेक्षित आवक होणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १६०० रुपये डझन दराने हापूस विकला जात आहे. 

आंब्यांचे दर (प्रति किलाे)
बदामी    ८०
लालबाग    ५०
तोतापुरी    ४०
गोळा     ४० 

किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपये किलो दराने आंबे उपलब्ध आहेत. 
कर्नाटकी हापूसला होलसेल मार्केटमध्ये ८० ते १५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १२५ ते २५० रुपये भाव मिळत आहे. 
यावर्षी हापूसचे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे यापुढेही दक्षिणेकडील आंब्याचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. 

कोकणातून प्रतिदिन २५ ते ३० हजार पेट्यांची आवक सुरू आहे. पुढील एक महिना कोकणातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.  दक्षिणेकडील राज्यांमधून ४० ते ४५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. 
- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

Web Title: mangoes from south are in full demand in APMC arrival of Hapus from Konkan has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा