एक्स्प्रेस-वेवरील अपघातात मानखुर्दचे ६ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:53 AM2018-05-01T05:53:00+5:302018-05-01T05:53:00+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर देवद गावाजवळ ओमनी कारला टेम्पोने सोमवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण ठार झाले असून दोघे जखमी झाले आहेत.

Mankhurd's 6 killed in an accident in Expressway | एक्स्प्रेस-वेवरील अपघातात मानखुर्दचे ६ ठार

एक्स्प्रेस-वेवरील अपघातात मानखुर्दचे ६ ठार

Next

पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर देवद गावाजवळ ओमनी कारला टेम्पोने सोमवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण ठार झाले असून दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील मानखुर्द येथील संतोष प्रजापती, रशीद निफज खान, जुंमन शौरतअली शेख, दिनेश जैस्वाल, अयोध्या यादव, रामचंद्र यादव, संजय छोटेलाल राजभर, मुंद्रिका प्रसाद जैस्वाल हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून पुण्याला ओमनी कारने (एमएच ०४एएस ९३८९) लग्नासाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांची गाडी दोन ते तीन वेळा बंद पडल्यामुळे ही गाडी पुण्यापर्यंत जाणार नसल्याने त्यांनी बोरले येथील टोल नाक्याजवळ यू टर्न घेतला.
देवद गावाजवळ गाडी पुन्हा बंद पडली. या वेळी गाडीतील सहा जण खाली उतरून धक्का देत असताना, सकाळी ५ च्या सुमारास टेंभुर्णी, सोलापूर येथून कलिंगड घेऊन आलेल्या टेम्पोने (एमएच ४५ एएफ ९५४५) एक्स्प्रेस-वेवरील रेलिंगला घासत येऊन ओमनी कार ढकलणाऱ्यांना धडक दिली. यात तिघे जण जागीच ठार झाले, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातात संतोष प्रजापती (४०), रशीद निफज खान (२४), जुंमन शौरतअली शेख (४५), अयोध्या यादव (२५), दिनेश जैस्वाल, रामचंद्र यादव (२५) सर्व राहणार मानखुर्द यांचा मृत्यू झाला. संजय छोटेलाल राजभर (२८) आणि मुंद्रिका प्रसाद जैस्वाल (३६) इंदिरानगर मानखुर्द, मुंबई हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पोचालक व क्लीनर पळून गेले आहेत.

मदतीचा हात
अपघाताची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी ५ रु ग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.

ज्या टेम्पोने धडक दिली तो टेंभुर्णी, सोलापूर येथील असून या टेम्पो मालकाशी संपर्क साधण्यात आला आहे. ट्रकचालक व क्लीनर यांचा लवकरच शोध घेण्यात येईल.
- प्रकाश निलेवाड, सहायक पोलीस आयुक्त, पनवेल

Web Title: Mankhurd's 6 killed in an accident in Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.