शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य - १२ नोव्हेंबर २०२४, नोकरी, व्यवसायात कामाची प्रशंसा होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल
3
प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!
4
एसटीचा ‘प्रासंगिक करार’; ९ हजार बस दोन दिवस राहणार निवडणूक कर्तव्यावर!
5
माजी आमदार आडम यांच्या घरावर दगडफेक; सोलापुरात खळबळ
6
भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात दाेघे जागीच ठार 
7
"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी
8
दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त
9
कल्याणच्या बसला  उत्तर प्रदेशात अपघात; ट्रकच्या धडकेत ३८ जखमी, ९ जण गंभीर!
10
तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!
11
अल-कायदाच्या टेरर फंडिंग नेटवर्कचा पर्दाफाश; NIA चे देशभरात अनेक ठिकाणी छापे
12
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
13
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
14
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
15
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
17
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
18
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
19
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार

एक्स्प्रेस-वेवरील अपघातात मानखुर्दचे ६ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 5:53 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर देवद गावाजवळ ओमनी कारला टेम्पोने सोमवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण ठार झाले असून दोघे जखमी झाले आहेत.

पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर देवद गावाजवळ ओमनी कारला टेम्पोने सोमवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात सहा जण ठार झाले असून दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.मुंबईतील मानखुर्द येथील संतोष प्रजापती, रशीद निफज खान, जुंमन शौरतअली शेख, दिनेश जैस्वाल, अयोध्या यादव, रामचंद्र यादव, संजय छोटेलाल राजभर, मुंद्रिका प्रसाद जैस्वाल हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून पुण्याला ओमनी कारने (एमएच ०४एएस ९३८९) लग्नासाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांची गाडी दोन ते तीन वेळा बंद पडल्यामुळे ही गाडी पुण्यापर्यंत जाणार नसल्याने त्यांनी बोरले येथील टोल नाक्याजवळ यू टर्न घेतला.देवद गावाजवळ गाडी पुन्हा बंद पडली. या वेळी गाडीतील सहा जण खाली उतरून धक्का देत असताना, सकाळी ५ च्या सुमारास टेंभुर्णी, सोलापूर येथून कलिंगड घेऊन आलेल्या टेम्पोने (एमएच ४५ एएफ ९५४५) एक्स्प्रेस-वेवरील रेलिंगला घासत येऊन ओमनी कार ढकलणाऱ्यांना धडक दिली. यात तिघे जण जागीच ठार झाले, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातात संतोष प्रजापती (४०), रशीद निफज खान (२४), जुंमन शौरतअली शेख (४५), अयोध्या यादव (२५), दिनेश जैस्वाल, रामचंद्र यादव (२५) सर्व राहणार मानखुर्द यांचा मृत्यू झाला. संजय छोटेलाल राजभर (२८) आणि मुंद्रिका प्रसाद जैस्वाल (३६) इंदिरानगर मानखुर्द, मुंबई हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पोचालक व क्लीनर पळून गेले आहेत.मदतीचा हातअपघाताची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी ५ रु ग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.ज्या टेम्पोने धडक दिली तो टेंभुर्णी, सोलापूर येथील असून या टेम्पो मालकाशी संपर्क साधण्यात आला आहे. ट्रकचालक व क्लीनर यांचा लवकरच शोध घेण्यात येईल.- प्रकाश निलेवाड, सहायक पोलीस आयुक्त, पनवेल