कर्जत : माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचा ९ सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर, राज्य शासनाने मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई होईल, असे जाहीर केले होते. मात्र, २०-२२ दिवसांत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पत्रकार आक्रमक झाले.अखेर या प्रकरणाला गती मिळाली असून, कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली चौकशी समिती संतोष पवार यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पोहोचली आहे. पवार यांना ९ सप्टेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, नेरळ येथून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना तेथून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून नवी मुंबईतील रुग्णालयात नेले जात होते. वाटेत पवार यांना आॅक्सिजन पुरवठा करणाºया सिलिंडरचे झाकण उडाले. परिणामी, आॅक्सिजनअभावी पवार यांचे निधन झाले होते.जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी चारसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचे आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते.समितीच्या सदस्य पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता गवळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजेकर, सर्व्हिस अभियंता गणेश कांबळे, रुग्णवाहिका समन्वयक संतोष काळे यांनी या कालावधीत कर्जत उपजिल्हा रुग्णालय, अधीक्षक, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासह पवार यांच्यावर ८ सप्टेंबर रोजी तपासणी करून औषधोपचार करणाºया नेरळमधील खासगी डॉक्टरांची चौकशी केली होती.तर संतोष पवार यांचा मुलगा मल्हार आपले म्हणणे १० सप्टेंबर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिले होते. कारवाई होत नसल्याने कर्जतमधील पत्रकारांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रायगडच्या पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना १३ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे संतोष पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. आता नव्या अधिक्षकांकडे पदभ ार आला आहे.संजय धनेगावे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षककर्जत येथे आरोग्य आणि कोविडचा आढावा घेण्यासाठी आलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या आढावा बैठकीत अनेक प्रश्न संतोष पेरणे, बाळा गुरव, प्रसाद अटक यांनी उपस्थित केले.पत्रकार आक्रमक झाल्यानंतर अखेर ३० सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुधीर माने यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे यांचा पदभार काढून घेतला आहे.|तेथील अन्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय धनेगावे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, चौकशी समितीने ५ आॅक्टोबरपूर्वी संबंधित मृत्युप्रकरणी कारवाई न केल्यास पत्रकार साखळी उपोषण करणार आहेत.
मनोज बनसोडे यांचा पदभार काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:20 AM