मनोज जरांगेंची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार, अंतिम तोडग्यासाठी हालचाली सुरू
By नामदेव मोरे | Published: January 26, 2024 09:34 AM2024-01-26T09:34:22+5:302024-01-26T09:55:36+5:30
आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी पहाटेपासून गर्दी केली आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी वकिलांशी चर्चा सुरू केली आहे. यानंतर ते माध्यमांशी बोलून वाशीतील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी पहाटेपासून गर्दी केली आहे.
शासनाचे शिष्टमंडळ बाजार समितीमध्ये पोहचले आहे. बाजार समिती मुख्यालय आवारात ही आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा च्या घोषणा सुरू असून सर्व परिसर घोषणांनी दुमदुमला आहे. शिष्टमंडळासोबत काय चर्चा होणार व मनोज जरांगे पाटील काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिष्टमंडळात सुमंत भांगे, मंगेश चिवटे यांचा समावेश आहे.