श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एस.बी. रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. वाशी परिसरात शिवज्योत व प्रतिमा पूजनाने उत्सवाला सुरुवात करण्यात आली. दुपारपासून पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. महापे येथून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीची सांगता वाशी येथे करण्यात आली. संघटनेचे त्यानंतर संध्याकाळी वाशी रेल्वे स्थानक येथे शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे शरद नाईक, भरत नाईक, अप्पा वाडकर, बाळू शिरसाठ, तुकाराम गाडगे, दत्ता शिंदे, विकास बागुल, अप्पा मोटे, दिलीप आमले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आधारचे रक्तदान शिबिरघणसोलीमधील आधार फाउंडेशनने शिवजयंतीनिमित्त सेक्टर ९ मधील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी नागरिकांसाठी रूग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. वाशी शिवाजी चौक ते घणसोलीमध्ये शिवज्योतीची मिरवणूक काढली. कार्यक्रमास गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, आयोजक प्रमोद साळुंखे, व्ही. एस. मैत्री, युवराज पाटील, सुनील नरलकर, दिगंबर नार्वेकर, दत्तात्रय कुंभार, सुशांत भिसे, विजय पाटील, संपत केरेकर, योगेश चिकने व इतर पदाधिकारी उपस्थित होेते.ऐरोलीतील शाळेत विविध कलागुणदर्शनऐरोलीतील सरस्वती विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शाळेत विविध गुणदर्शन स्पर्धा पार पडली. यात पोवाडे, नाटक, एकपात्री अभिनय, नाट्यछटा आदी कार्यक्र म विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवजयंती उत्सव सोहळ््याला मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, सुनंदा जाधव, पर्यवेक्षक बशीर शेख, अध्यापिका प्रिया पाटणकर, रजनी सावरकर, अध्यापक प्रदीप यादव, राजू भांगरे व राजेश गावित आणि स्पर्धक विद्यार्थी आदी उपस्थित होते. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन अध्यापक सुरेश देशमुख यांनी केले.चिमुकल्यांनी दिला गड-किल्ले जोपासण्याचा संदेशनेरूळ नवी मुंबई येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या अभ्यास केंद्रातील मुलांनी नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याची साफसफाई करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन या वेळी करण्यात आले. नवी मुंबईतील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा, परंतु दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याची साफसफाई करून अभ्यास केंद्रातील मुलांनी गड-किल्ले हे आपल्या देशाची संपत्ती असून यांचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे असा मोलाचा संदेश दिला. या वेळी संस्थेतील सदस्य विकास गवई यांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी महाराज जन्मले हे गीत गायले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश शेळके, जालिंदर यमगर, विकास गवई, ज्ञानेश्वर साळुंखे, आशुतोष बांदल, प्रथमेश इंगळे व अभ्यास केंद्रातील मुले उपस्थित होती.शिवजयंतीनिमित्ताने जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घणसोली सिम्प्लेक्स येथील ओम साईधाम सोसायटीमध्ये भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याकरिता वाशी ते घणसोलीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. त्यामध्ये लहान-थोरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
शिवरायांना मानाचा मुजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:54 AM