पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद, घर खरेदी-विक्रीवर कोरोनाचा मोठा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:31 AM2020-10-19T09:31:45+5:302020-10-19T09:49:24+5:30
भासत असल्याने, घर खरेदी-विक्रीकडे नागरिकांनी पाठ दाखविली आहे, तर पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद पडले आहेत. नवी मुंबई विमानतळाची सिडकोच्या माध्यमातून पनवेलजवळच निर्मिती होत असल्याने, आजूबाजूच्या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कळंबोली : कोरोना रोगोच्या महामारीमुळे पनवेल परिसरातील रिअल इस्टेट व्यवसायात मंदी आली आहे. लॉकडाऊनचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. दरवर्षी दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर घर घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते, परंतु आर्थिक चणचण
भासत असल्याने, घर खरेदी-विक्रीकडे नागरिकांनी पाठ दाखविली आहे, तर पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद पडले आहेत. नवी मुंबई विमानतळाची सिडकोच्या माध्यमातून पनवेलजवळच निर्मिती होत असल्याने, आजूबाजूच्या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक गृनिर्माण प्रकल्प पनवेल शहरासह तालुक्यात सुरू झाले. जागेचे भावही गगनाला भिडले होते.
घर खरेदी-विक्रीत तेजी आली असल्याने, व्यावसायिक जागा खरेदी करून, त्यावर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर सिडकोने नैना प्राधिकरणाची स्वतंत्र स्थापन करण्यात आलेल्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाने रिअल इस्टेट व्यवसायात मंदी आली आहे.त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर कोणतीही बुकिंग नसल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. या आगोदर नागरिकांनी घरखरेदी केलेल्यांनाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कोरोनामुळे कामगार मिळत नसल्यानेही इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे बुकिंग ग्राहकासह बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. या आगोदर नैना प्रकल्पामुळे व्यावसायिकांना विकास शुल्क जास्त प्रमाणात भरावे लागत असल्याने, व्यावसायिकांनी नाराजी व्याक्त केली होती. सद्य परिस्थितीत कोरोनामुळे पनवेल, पोयंजे, वाकडी, शिवकर, विचुंबे, नेरे, वाकडी या परिसरातील बांधकाम बंद आहेत.
मार्केटमध्ये घरांचे खरेदी-विक्री व्यवहार कमीच झाले आहेत. कोरोनामुळे ग्राहकांनी पाठ दाखवली आहे. या आगोदर सिडको नैनाच्या जाचक अटीमुळे बांधकाम व्यावसायिक हतबल झाले आहेत. आता कोरोनामुळे कंबरडेच मोडले.
- रूपेश भोईर,
न्यू मिलिनियम डेव्हलपर्स पनवेल