घरांच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:27 AM2018-12-13T00:27:52+5:302018-12-13T00:28:12+5:30

घरविक्रीच्या बहाण्याने २० जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Many people cheat on making fun of houses | घरांच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

घरांच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

Next

नवी मुंबई : घरविक्रीच्या बहाण्याने २० जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेलापूरच्या विकासक पितापुत्राविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी अनधिकृत इमारत उभारून त्यामधील घरांची विक्री करून कोट्यवधींचा अपहार केला आहे.

बेलापूर येथील फणसपाडा परिसरात चार मजली अनधिकृत इमारत उभारून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महंमद अब्बास काझी व रफिक महंमद काझी या विकासक पितापुत्रावर सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी २०१४ साली फणसपाडा परिसरात चार मजली इमारत उभारली होती. सदर इमारतीला पालिकेची परवानगी असल्याची बनावट कागदपत्रे दाखवून त्यांनी ग्राहकांना घरांची विक्री केली होती. त्यानुसार बेलापूर गावचेच रहिवासी शमशु कोतवडकर (५२) यांनीही त्यांच्याकडे घर खरेदीसाठी इच्छुकता दर्शवली होती. त्यानुसार कोतवडकर यांनी घरासाठी टप्प्याटप्प्याने रोख व धनादेशाद्वारे काझी पितापुत्रांना १२ लाख ७५ हजार रुपये दिले होते; परंतु २०१६ मध्ये सदर इमारत अनधिकृत असल्याने पालिकेने पाडली असता, आपली फसवणूक झाल्याचे कोतवडकर यांच्यासह इतर १९ ग्राहकांना समजले. या वेळी काझी पितापुत्रांनी दोन वर्षांत नवी इमारत उभारून घरे देतो, असे आश्वासन दिले. तोपर्यंत महिना आठ हजार रुपये भाड्याचा खर्चही देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर काझी पितापुत्रांनी संपर्क टाळण्याने व भाड्यापोटी ठरलेली रक्कम देण्यासही नकार दिल्याने घरासाठी घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी ग्राहकांनी तगादा लावला होता. या वेळी कोतवडकर यांना महंमद काझीने भाड्याच्या रकमेचा दिलेला सहा लाखांचा धनादेशही बँकेत वटला नाही. यामुळे विकासक काझी पितापुत्रांकडून सातत्याने होत असलेल्या फसवणुकीविरोधात कोतवडकर यांच्यासह आसिफ मिरकर व जमीर काझी यांच्यासह इतरांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली आहे.

Web Title: Many people cheat on making fun of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.