शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

‘अथर्व’च्या गैरव्यवहारात अनेकांचे हात !

By admin | Published: February 08, 2017 4:30 AM

सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविणाऱ्या ठेकेदाराने कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी, ईएसआय, सानुग्रह अनुदानाची रक्कम दिलेली नाही. सिडकोने निश्चित

नामदेव मोरे, नवी मुंबई सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविणाऱ्या ठेकेदाराने कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी, ईएसआय, सानुग्रह अनुदानाची रक्कम दिलेली नाही. सिडकोने निश्चित केलेले पूर्ण वेतनही दिलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या लाखो रुपयांचा अपहार करूनही संबंधितांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सिडकोमधीलच काही घटक या अनागोंदी कारभाराच्या पाठीशी असल्याचे बोलले जात असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची ब्रेन मॅपिंग करण्याची मागणीही होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदनाम झालेल्या सिडकोची प्रतिमा सुधारण्यासाठी शासनाने चार वर्षांपूर्वी संजय भाटिया व व्ही. राधा, प्रज्ञा सरवदे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. या अधिकाऱ्यांनी सिडकोचा कारभार सुधारण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. या महामंडळाची प्रतिमा पूर्वीपेक्षा सुधारण्यात त्यांना यश आले असले तरी त्यांच्या कार्यकाळात मनुष्यबळ पुरविण्याचे काम करणाऱ्या अथर्व फॅसिलिटीज सोलुशन या कंपनीने कामगारांची अक्षरश: पिळवणूक सुरू ठेवली होती. सिडकोला लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यासाठी २०१० मध्ये निविदा न मागविता अथर्व एजन्सीला नियुक्त करण्यात आले. याविषयी आवाज उठविण्यास सुरवात झाल्यानंतर २०१४ मध्ये निविदा मागवून याच कंपनीला काम देण्यात आले. आतापर्यंत जवळपास ४०० कर्मचारी या एजन्सीच्या माध्यमातून पुरविण्यात आले. नियमाप्रमाणे कामगारांना भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, कामगार कल्याण मंडळाकडे आरोग्य सुविधेसाठीची रक्कम भरणे ठेकेदाराची जबाबदारी होती. रजेचा पगार, दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान देणे आवश्यक होते. पण ठेकेदाराने सिडकोने दिलेले वेतनही पूर्णपणे कधीच कामगारांना दिले नाही. भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. वास्तविक भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरल्याशिवाय ठेकेदाराला बिलेच दिली नाही पाहिजे होती. कामगारांना नियमितपणे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला दिला जातो की नाही हे तपासून पाहणेही सिडको प्रशासनाची जबाबदारी होती. पण कार्मिक विभागाने सहा वर्षांत याविषयी सविस्तर माहिती घेतलेली नाही. सिडकोने अथर्व एजन्सीला काळ्या यादीत टाकले आहे. पण ही कारवाई गैरव्यवहार दडपण्यासाठी आहे. वास्तविक सिडकोने ठेकेदाराला कामगारांची देणी देण्यासाठी दिलेली रक्कम प्रत्यक्ष कामगारांना दिलेली नाही. याचाच अर्थ ठेकेदाराने सिडकोच्या पैशाचा अपहार केला आहे. सहा वर्षांमध्ये जवळपास दहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी केला आहे. या प्रकरणी मे २०१६ पासून सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पण सिडको प्रशासनाने अद्याप या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. यामुळे आता मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनाही पत्र दिले आहे. याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कामगारांची सर्व देणी देण्यात यावीत. ठेकेदारावर व सिडकोमधील जे अधिकारी व कर्मचारी या घोटाळ्यास जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.