मराठा समाजाने मानले एपीएमसी, पोलिस अन् महापालिकेचे आभार

By नारायण जाधव | Published: January 30, 2024 07:02 PM2024-01-30T19:02:41+5:302024-01-30T19:03:02+5:30

नवी मुंबई आणि पनवेल महापालिका यांचे सकल मराठा समाजाने सार्वजनिक पत्राद्वारे आभार मानले आहेत.

Maratha community thanked APMC, Police and Municipal Corporation | मराठा समाजाने मानले एपीएमसी, पोलिस अन् महापालिकेचे आभार

मराठा समाजाने मानले एपीएमसी, पोलिस अन् महापालिकेचे आभार

नवी मुंबई: मराठा आरक्षण दिंडीत आलेल्या लाखो मराठा आंदोलनकर्त्यांची राहण्याची व खाणपाणाची सोय केल्याबद्दल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केट, भाजीपाला, कांदा-बटाटा, दाणा मार्केट, मसाला मार्केटसह व्यापारी संघटना व सर्व माथाडी कामगार, नवी मुंबई पोलिस, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका यांचे सकल मराठा समाजाने सार्वजनिक पत्राद्वारे आभार मानले आहेत. मराठा आरक्षण दिंडीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने १,१०० मोबाइल टॉयलेट, २४ तास पाणी, जेट मशिन, सफाई व्यवस्थेसह पाचही मार्केटमध्ये रुग्णवाहिका, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी नेमल्याबद्दल आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाईंसह सर्व अधिका-यांचे आभार मानले आहेत.

सिडको एक्जिबिशन हॉल मिळवून दिल्याबद्दल व भोजन व्यवस्था केल्याबद्दल मराठी साहित्य संमेलन, मराठी शब्दकोश महामंडळ व मंत्री दीपक केसरकर, तसेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट नेरूळ, भारती विद्यापीठ, सीबीडी बेलापूर, यांनीही राहण्याची सोय केली होती. आरोग्य सुविधा पुरवल्याबद्दल केमिस्ट असोसिएशन नवी मुंबई, एमएजीएम हॉस्पिटल, सूरज हॉस्पिटल यांचेही आभार मानले आहेत.

पोलिस प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे हे आंदोलन कुठलेही गालबोट न लागता यशश्वी झाल्याने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे उपायुक्त विवेक पानसरे, तिरुपती काकडे यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानले आहेत.

एपीएमसीचे विशेष आभार
एमपीएमसी मार्केट मिळवून दिल्याबद्दल आ. शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, अशोक डक, अशोक वाळूंज, संजय पानसरे, के. डी मोरे यांचे विशेष आभार मानले आहेत. नवी मुंबईतील मराठासह इतर सर्व समाजबांधवांनी तन, मन, धनाने मराठा मोर्चास सहकार्य केल्याबद्दलही ऋण व्यक्त केले आहेत.

Web Title: Maratha community thanked APMC, Police and Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.