सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 07:44 AM2024-01-28T07:44:23+5:302024-01-28T07:44:50+5:30

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती.

Maratha Reservation: Maratha protestors played a game of chess with the government | सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली

सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली

नवी मुंबई : मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती. मनोज जरांगे-पाटील शहरात दाखल होण्याच्या चर्चेपासून ते शनिवारी पहाटेच्या पत्रकार परिषदेपर्यंत २४ तास प्रत्येक क्षण कसोटीचा ठरला होता. नवी मुंबईत आल्यापासून ते परत जाईपर्यंत बुद्धिबळाचा लढा सुरू झाला.

अंक पहिला 
पहाटे ३ : बाजार समितीमध्ये आंदोलकांबरोबरच गर्दी.
पहाटे ५ : लोणावळ्याहून जरांगे बाजार समितीत दाखल 
सकाळी ८.३० : ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती.
९.१५ :  सुमंत भांगे यांच्यासह सरकारचे शिष्टमंडळ, कागदपत्रे घेऊन बाजार समितीत दाखल.
१०.३६ : शिष्टमंडळासोबतची बैठक आटोपली.
११.३० : सहकारी आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर जरांगे यांनी इमारतीबाहेर येऊन आंदोलकांशी संवाद. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेण्याचे जाहीर केले. 
दुपारी १२.३० : वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेला सुरुवात.
१२.५५ : साउंड सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे सभा २ वाजता घेण्याची घोषणा.
३.३० : पुन्हा सभेला सुरुवात.
सायंकाळी ४ : सगेसोयऱ्यांचा अध्यादेश, गुन्हे मागे घेणे, नोकर भरती महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागण्या. नवी मुंबईतच मुक्काम करण्याचा निर्धार.

अंक २
सायंकाळी ४ ते ११ : सभेनंतर सात तासांत विविध तज्ज्ञांची चर्चा, शासनाने दिलेल्या पत्रांचा सखोल अभ्यास व पुढील दिशा ठरविण्यासाठीचे नियोजन.
रात्री ११ : सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डाॅ. अमोल शिंदे हे  सुधारित अधिसूचना घेऊन बाजार समितीमध्ये दाखल.
मध्यरात्री १२ : शिष्टमंडळासोबत तज्ज्ञांकडून 
अधिसूचना अभ्यासण्यास सुरुवात. 
१.३० : मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा चर्चा करण्यासाठी बाजार समितीमध्ये दाखल.
२.३० : मध्यरात्री जरांगे यांनी इमारती बाहेर येऊन आंदोलकांशी चर्चा केली व शासनाकडून मागण्या मान्य झाल्याचे सर्वांना सांगितले. 
२.५२ : जरांगे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू. 
३.०० : पहाटे सगेसोयऱ्यांना कुणबी दाखला देण्याची अधिसूचना दाखवत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिसूचना स्वीकारण्याचे जाहीर.
३.१५ : सरकारचे शिष्टमंडळ बाजार समितीमधून बाहेर.
३.३० : बाजार समितीमध्ये फटाके फोडून, ढोल-ताशा वाजवून आनंदोत्सवाला सुरुवात.
अंक ३
सकाळी ९.३० :  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोसंबीचा रस घेत जरांगे-पाटील यांनी उपोषण साेडले. 
सकाळी ९.५७ : ऐतिहासिक विजयी सभेला सुरुवात.

Web Title: Maratha Reservation: Maratha protestors played a game of chess with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.