शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार"

By नामदेव मोरे | Published: February 07, 2024 6:45 PM

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार : प्रत्येक आमदाराला निवेदन देण्याचे मराठा समाजाला आवाहन

नवी मुंबई : राज्यातील कुणबी नोंदी ५७ लाखावरून ६२ लाखांवर पोहचल्या आहेत. सगेसोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अद्यादेश सरकारने दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठीचे निवेदन प्रत्येक आमदाराला निवेदन द्या. सर्वांच्या सहमतीने सगेसोयऱ्यांचा कायदा मंजूर झाला पाहिजे. १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषणाला बसत असून कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही. समाजासाठी बलीदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

नवी मुंबईमधील आगरी कोळी भवनमध्ये आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर दिलेल्या धडकेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. राज्यात ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. आता हाच आकडा ६२ लाखांवर पोहचला आहे. ३९ लाख नागरिकांना प्रत्यक्षात दाखल्यांचे वाटप केले आहे. सगे सोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याचा अद्यादेश आपल्याला दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत आपला लढा सुरूच राहिल.

आरक्षणाच्या लढ्यामुळे मराठ्यांनी अभुतपूर्व एकजूट दाखविली आहे. राज्यातील सकल मराठा समाजाने आपल्या मतदार संघातील आमदारांना फोन करा, निवेदन देवून सगेसोयऱ्याच्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करावे. सर्वमताने हा निर्णय झाला पाहिजे. मी स्वत: १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसत आहे. कायद्यात रूपांतर होईपर्यंत माघार घेणार नाही. जीव गेला तरी मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या वेशीवर धडक दिल्यानंतर काहींना पोटदुखी सुरू झाली आहे. दुर्दैवाने आपल्या समाजातीलही काही जण आहेत. आता हेवेदावे बाजूला ठेवा आरक्षणाची निखराची लढाई सुरू आहे सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आंदोलनात नवी मुंबईकरांनी केलेल्या सहकार्याचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

आरक्षण भेटू द्या त्याच्यात किती दम आहे पाहतोछगन भुजबळ यांच्यावरही नाव न घेता टिका केली. मराठ्यांचे सर्वाधीक नुकसान त्याने केले. ओबीसी नेता म्हणवितो व गोर गरीबांचे नुकसान करतो. त्याच्या सारखा जातीयवादी माणूस पाहिला नाही. ज्या पक्षात जातो तो पक्षच तोडतो. एकदा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू द्या त्याच्यात किती दम आहे तेच पाहतो असा इशाराही त्यांनी दिला.

...तर मंडल आयोगाला आव्हान देणारचमंडल आयोगाला आव्हान देतो असे म्हटल्याने अनेकांना घाम फुटला. पण आम्ही कोणाचे नुकसान करणार नाही. मराठा ओबीसी वाद आम्ही होऊ देणार नाही. पण गोरगरीब मराठ्यांचे नुकसान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही मंडल आयोगाला आव्हान दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील