ऐतिहासिक मोर्चासाठी मराठा एकवटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:42 AM2017-08-07T06:42:13+5:302017-08-08T11:21:38+5:30
‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची शपथ घेण्यात आली.
‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची शपथ घेण्यात आली. भगवा ध्वज हातामध्ये घेवून काढण्यात आलेल्या या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पावसाळा सुरू झाल्यापासून महामार्गावर रोज प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. परंतु ५ हजारपेक्षा जास्त मोटारसायकलस्वार रॅलीमध्ये सहभागी होवूनही अजिबात वाहतूककोंडी झाली नाही.
नवी मुंबई, पनवेल : मराठा क्रांती मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई व पनवेलमध्ये मोटारसायकल रॅली काढली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत हजारो तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. खारघरमधील उत्सव चौक ते वाशीतील शिवाजी चौकापर्यंत काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी तरुणांनी शिस्तीचेही दर्शन घडविले.
मुंबईमध्ये ९ आॅगस्टला होणाºया मराठा क्रांती मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून लाखो नागरिक सहभागी होणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरातून मोर्चामध्ये सहभागी होणारे नागरिक त्यांची वाहने पनवेल व नवी मुंबईमध्ये थांबवून रेल्वेने मुंबईमध्ये जाणार आहेत. यामुळे परिसरामधील मराठा बांधवांची जबाबदारी वाढली आहे. राज्यातून येणाºया नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही नवी मुंबई, पनवेलमधील कार्यकर्त्यांवर आहे. यामुळे एक महिन्यापासून येथील मराठा समाजाचे आमदार, नगरसेवक, सामाजिक संघटना, युवकांच्या संघटना परिश्रम घेत आहेत. मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. पनवेलमधील पदाधिकाºयांनी खारघरमधील उत्सव चौक ते वाशी शिवाजी चौकापर्यंत रॅली काढली.
माथाडींचा सहभाग
मोटारसायकल रॅलीमध्ये सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही सहभागी झाले होते. यामध्ये माथाडी कामगारांची संख्याही लक्षणीय होती. कामगारांनी मोर्चाचे नियोजन करण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये स्वत:ला झोकून दिले होते. माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील यांचे मराठा आरक्षणाचे स्वप्न साकार करण्याची हीच वेळ असल्याने कामगार व त्यांची मुलेही मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाली होती.
शिस्तबद्ध दुचाकी रॅली
मोटारसायकल रॅली महामार्गावरून काढण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांवर दडपण आले होते. शनिवार व रविवारी सर्वाधिक वाहतूककोंडी होत असते. मोटारसायकल रॅलीने महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण तरुणांनी अत्यंत शिस्तीचे दर्शन घडविल्यामुळे रॅलीदरम्यान कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. तरुणांनी उत्स्फूर्तपणे १० ते २० जणांचे ग्रुप तयार करून जबाबदारी वाटून घेतली होती. रॅली दरम्यान प्लास्टीकच्या बाटल्यांचा कचरा होणार नाही याचीही काळजी घेतली होती. रॅलीमध्ये आमदार नरेंद्र पाटील, मिलिंद सूर्याराव, विनोद साबळे, विनोद पोखरकर, अंकुश कदम, मोहन पाडळे, राहुल गावडे, सूरज बर्गे, गणेश पावगे हजारो तरुण सहभागी झाले होते.
रायगड व नवी मुंबईच्यावतीने जनजागृती करण्यासाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये हजारो तरुण सहभागी झाले होते. खारघरमधून उत्सव चौकापासून वाशीतील शिवाजी चौकापर्यंत शांततेने रॅली काढण्यात आली. ९ आॅगस्टला होणाºया महामोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते.