शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

ऐतिहासिक मोर्चासाठी मराठा एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:42 AM

‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची शपथ घेण्यात आली.

‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. वाशीतील शिवाजी चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ९ आॅगस्टच्या मोर्चामध्ये परिवारासह सहभागी होण्याची शपथ घेण्यात आली. भगवा ध्वज हातामध्ये घेवून काढण्यात आलेल्या या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. पावसाळा सुरू झाल्यापासून महामार्गावर रोज प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. परंतु ५ हजारपेक्षा जास्त मोटारसायकलस्वार रॅलीमध्ये सहभागी होवूनही अजिबात वाहतूककोंडी झाली नाही. नवी मुंबई, पनवेल : मराठा क्रांती मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई व पनवेलमध्ये मोटारसायकल रॅली काढली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत हजारो तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. खारघरमधील उत्सव चौक ते वाशीतील शिवाजी चौकापर्यंत काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी तरुणांनी शिस्तीचेही दर्शन घडविले.मुंबईमध्ये ९ आॅगस्टला होणाºया मराठा क्रांती मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून लाखो नागरिक सहभागी होणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरातून मोर्चामध्ये सहभागी होणारे नागरिक त्यांची वाहने पनवेल व नवी मुंबईमध्ये थांबवून रेल्वेने मुंबईमध्ये जाणार आहेत. यामुळे परिसरामधील मराठा बांधवांची जबाबदारी वाढली आहे. राज्यातून येणाºया नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही नवी मुंबई, पनवेलमधील कार्यकर्त्यांवर आहे. यामुळे एक महिन्यापासून येथील मराठा समाजाचे आमदार, नगरसेवक, सामाजिक संघटना, युवकांच्या संघटना परिश्रम घेत आहेत. मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी रविवारी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. पनवेलमधील पदाधिकाºयांनी खारघरमधील उत्सव चौक ते वाशी शिवाजी चौकापर्यंत रॅली काढली.माथाडींचा सहभागमोटारसायकल रॅलीमध्ये सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही सहभागी झाले होते. यामध्ये माथाडी कामगारांची संख्याही लक्षणीय होती. कामगारांनी मोर्चाचे नियोजन करण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये स्वत:ला झोकून दिले होते. माथाडींचे दैवत अण्णासाहेब पाटील यांचे मराठा आरक्षणाचे स्वप्न साकार करण्याची हीच वेळ असल्याने कामगार व त्यांची मुलेही मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाली होती.शिस्तबद्ध दुचाकी रॅलीमोटारसायकल रॅली महामार्गावरून काढण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांवर दडपण आले होते. शनिवार व रविवारी सर्वाधिक वाहतूककोंडी होत असते. मोटारसायकल रॅलीने महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण तरुणांनी अत्यंत शिस्तीचे दर्शन घडविल्यामुळे रॅलीदरम्यान कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. तरुणांनी उत्स्फूर्तपणे १० ते २० जणांचे ग्रुप तयार करून जबाबदारी वाटून घेतली होती. रॅली दरम्यान प्लास्टीकच्या बाटल्यांचा कचरा होणार नाही याचीही काळजी घेतली होती. रॅलीमध्ये आमदार नरेंद्र पाटील, मिलिंद सूर्याराव, विनोद साबळे, विनोद पोखरकर, अंकुश कदम, मोहन पाडळे, राहुल गावडे, सूरज बर्गे, गणेश पावगे हजारो तरुण सहभागी झाले होते.रायगड व नवी मुंबईच्यावतीने जनजागृती करण्यासाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये हजारो तरुण सहभागी झाले होते. खारघरमधून उत्सव चौकापासून वाशीतील शिवाजी चौकापर्यंत शांततेने रॅली काढण्यात आली. ९ आॅगस्टला होणाºया महामोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.- नरेंद्र पाटील, माथाडी नेते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा