मराठी माणसाने स्वदेशीचा नारा देण्याची गरज

By Admin | Published: January 23, 2017 05:49 AM2017-01-23T05:49:41+5:302017-01-23T05:49:41+5:30

अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी शपथ घेतल्याबरोबरच स्वदेशीचा नारा दिला. आपल्याकडे सर्वात आधी लोकमान्य टिळकांनी हा नारा दिला होता.

The Marathi people need the slogan of Swadeshi | मराठी माणसाने स्वदेशीचा नारा देण्याची गरज

मराठी माणसाने स्वदेशीचा नारा देण्याची गरज

googlenewsNext

पनवेल : अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी शपथ घेतल्याबरोबरच स्वदेशीचा नारा दिला. आपल्याकडे सर्वात आधी लोकमान्य टिळकांनी हा नारा दिला होता. त्यानंतर महात्मा गांधींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. आज देशातील बहुतांश बाजारपेठ चिनी वस्तूंनी काबीज केली असून आता नव्याने स्वदेशीची घोषणा द्यायला हवी, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी केले.
पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शांतिवन येथे रविवार मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला बाबा आमटे पुरस्कार विजेते वृक्ष मित्र मोहन हिराबाई हिरालाल, देवजी तोफा, रक्षा मेहता, जयवंत मठकर, कामगार नेते महेंद्र घरात, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशकर, सचिन पाटील सहायक संचालक कुष्ठरोग निवारण व मोठ्या प्रमाणात राज्यातून आलेले शांतिवन मित्र उपस्थित होते.
सध्या मध्यमवर्गीयांची वृत्ती बदलत असून पाश्चात्यांचे अनुकरण वाढले आहे. त्यामुळे आपली अवस्था शेजारी राहायचे पण सोबत नाही राहायचे, अशी झाली आहे. आपल्याकडे कायदे जास्त पण अमलबजावणी कमी अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
वृक्ष मित्र मोहन हिराबाई हिरालाल यांनी आमच्या राज्यात, आमच्या देशात, आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार असे केले तरच महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली येथील आदिवासी मित्र देवजी तोफा यांनी माणसाने स्वत:वर विश्वास ठेवावा, शांतीवन मानवतेचे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शरद नाईक पुरस्कार डॉ. दीपक नाईक व डॉ. राजेंद्र इटकरे यांना, शांताबाई धमणकर पुरस्कार नीला आपटे, मालती श्रीराम पुरस्कार चंद्रकांत चौधरी यांना देण्यात आला.

Web Title: The Marathi people need the slogan of Swadeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.