मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत आरक्षणावरून घोळ
By admin | Published: May 6, 2017 06:20 AM2017-05-06T06:20:48+5:302017-05-06T06:20:48+5:30
शहरातील क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धा सुरू आहेत. याची तिकिटे मिळवण्यासाठी रसिक
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : शहरातील क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धा सुरू आहेत. याची तिकिटे मिळवण्यासाठी रसिक प्रेक्षकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र विक्री सुरू होताच अवघ्या ३० मिनिटांत नाटक हाऊसफुल्ल होत असल्याने रसिकांमधून तीव्र नाराजी आहे. तिकिटांच्या विक्रीत घोळ होत असल्याची तक्रार प्रेक्षकवर्गातून होत आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २९ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धा फडके नाट्यगृहात २ ते ६ मेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची दररोज २ नाटके
होतात. गेली तीन वर्षे याठिकाणी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होत असल्याची माहिती नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरु ण कोळी यांनी दिली.
नाटकाचे तिकीट फक्त ५० रु पये असल्याने रसिक मोठ्या संख्येने नाटक पाहण्यासाठी येतात. उरणमधील एका संस्थेने तसेच नेरे येथील शांतीवन वृद्धाश्रमाकडून शुक्र वारी ३५ तिकिटे घेण्यात आली आहेत.
नाट्य निर्माता संघाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, शासनाने ए ते एफ या रांगेतील १६३ तिकिटे राखीव ठेवल्याने फक्त ३१६ तिकिटे विक्र ीला उपलब्ध आहेत. एका व्यक्तीने प्रत्येकी ४ तिकिटे घेतली तर तासाभरात तिकिटे संपतात. शासनाने स्पर्धेसाठी समन्वयक नेमला आहे. त्याने सन्मानिका फक्त प्रभाग १८ मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्याची चर्चाही शहरात सुरू आहे.