कळंबोली : ‘रन फॉर डायबेटीज’ हे घोषवाक्य घेऊन सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीसाठी रविवारी कामोठेकर मोठ्या संख्येने धावले. वसाहतीतील विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मिनी मॅरेथॉन आयोजित केली होती. या उपक्रमाला कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मधुमेहाविषयी जागृती करून एकोप्याचे दर्शन घडविले. लोकमत या उपक्र माचे माध्यम प्रायोजक होते.मॅरेथॉनच्या निमित्ताने मधुमित्र डायबेटिज केअर सेंटर, डायबेटीज हेल्थ फाऊंडेशन, कामोठे डॉक्टर असोसिएशन, राजे अकादमी, रिओ बुलेट ग्रुप, यशोदा रुग्णालय, रॉयल इनफिल्ड असोसिएशन, रायगड अॅथलेटिक असोसिएशन, महात्मा एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्लब आॅफ पनवेल या सर्व संस्था एका व्यासपीठावर आल्या होत्या. मॅरेथॉनचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप जगदाळे, कामोठे पोलीस ठाण्याचे जे.एम. पार्टे, प्राचार्या डॉ. नुसरत शेख, कामोठे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण भगत, मुख्य आयोजक डॉ. गणेश हांडे, स्वाती हांडे, प्रियंका पाटणकर, डॉ. बी.के. जाधव, डॉ. सुहास चौरे, डॉ. देवयानी कालेकर, अमित धावडे आदी उपस्थित होते. एकूण ८ गटात झालेल्या या स्पर्धेला कामोठे पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली. ज्येष्ठांबरोबरच कामोठेतील डॉक्टरांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. परिसरातील सामाजिक संस्था, रुग्णालय एकाच वेळी चांगल्या उपक्र माकरिता एकत्रित आले ही बाब कौतुकास्पद असल्याचे यावेळी आमदार ठाकूर यांनी सांगितले. देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठी असून त्यात प्रतिदिन वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. अनेकांना या आजाराबाबत माहिती नसते. त्याचबरोबर मधुमेह होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी याबाबत लोक अनभिज्ञ असतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मधुमेह नियंत्रणात ठेवायचा कसा, कोणती पथ्ये पाळायची याबाबत मधुमेह तज्ज्ञ डॉ. गणेश हांडे यांनी माहिती दिली. (वार्ताहर)विजेत्यांची नावे : रजत श्रीरंग शेलार, प्रमोद काकासाहेब बढे, नीलेश रामचंद्र सावंत, शुभान, नदाब, सुहास मंडळ, अतुल चेंबरे, रूपाली ननावरे, स्वप्नाली गायकवाड, आकांक्षा शेंडे, लक्ष्मी वायंगणकर, प्रियंका गायकवाड, पूजा कात्रब, मनोज म्हात्रे, सुनील राठोड, अण्णा ढवळे.
मधुमेहाच्या जागृतीसाठी मॅरेथॉन
By admin | Published: November 30, 2015 2:29 AM