मॅरेथॉनचे शिवधनुष्य पालिका पेलणार
By Admin | Published: July 1, 2017 07:34 AM2017-07-01T07:34:03+5:302017-07-01T07:34:03+5:30
यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विनाप्रयोजक घेण्याची ग्वाही महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिल्यानंतर ६५ लाखांची स्पर्धा ३० लाखांत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विनाप्रयोजक घेण्याची ग्वाही महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिल्यानंतर ६५ लाखांची स्पर्धा ३० लाखांत कशी घ्यायची, असा पेच महापालिका प्रशासनापुढे पडला होता. अखेर, हा पेच सोडवण्यासाठी महापौर दालनात झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या वाढीव खर्चाचे शिवधनुष्य पेलण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता नियोजित तारखेलाच ही स्पर्धा पार पाडली जाणार आहे. परंतु, पालिका हा खर्च कसा उभा करणार, याकडे लक्ष लागले आहे.
गेली दोन वर्षे महापौर मॅरेथॉन स्पर्धेला इव्हेंट मॅनेजमेंटचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु, मागील मॅरेथॉनच्या वेळेस महापौरांनाच या खर्चावरून तसेच प्रायोजकाच्या मुद्यावरून विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदाची स्पर्धा ही विनाप्रयोजक करण्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यात यापूर्वी स्पर्धेला ५० लाखांची आर्थिक तरतूद करण्यात येत होती. परंतु, मागील ती तरतूद २० लाखांनी कमी करून ३० लाखांवर केली. खर्च वाचवण्यासाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता. प्रायोजकांच्या माध्यमातून उर्वरित खर्च उचलला जात असल्याने आयुक्तांनी ही भूमिका घेतली होती. त्यानुसार, यंदादेखील हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मॅरेथॉनसाठी ३० लाखांचीच आर्थिक तरतूद केली. परंतु, महापौरांनी प्रायोजकांच्या माध्यमातून स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतल्याने वाढीव खर्चाचा भार कोण उचलणार, हा पेच पालिकेच्या क्रीडा विभागासह आयोजकांना पडला होता. दरम्यान, या स्पर्धेसाठी साधारणपणे ६५ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगून आयोजक आणि क्रीडा विभागाने महापौरांना पत्रदेखील दिले होते. हा खर्च कोण, कोणत्या साहित्यावर, कशा पद्धतीने करणार, याचे बजेट या पत्रात मांडले. त्यानुसार, आतापर्यंत तीन ते चार वेळा महापौरांना विनवणीदेखील केली होती. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच आयुक्तांनी नुकतीच महापौरांच्या दालनात जाऊन यासंदर्भात चर्चा केली.
या