पुरूषोत्तम करवामाजलगाव - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद दुसऱ्यांदा मराठवाड्याला मिळाले असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांना संधी देत सभापतीपद बहाल केले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी झाली होती त्यात महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभापतीपदाची निवडणूक तब्बल सहा महिने लांबणीवर पडली होती. सभापतीपदाची निवडणूक सोमवारी दुपारी झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक व माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची एकमताने निवड करण्यात आली. अशोक डक हे औरंगाबाद महसूल मधून निवडून आले होते. डक हे सर्वात जास्त मतदान घेणारे उमेदवार ठरले होते. यापूर्वी मराठवाड्यातील परभणी येथील रामप्रसाद बोर्डीकर हे या बाजार समितीवर सभापती होते त्यानंतर अशोक डक यांना संधी मिळाली आहे.