शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

माथाडी, एलआयजींसाठी व्यावसायिक पाणीदर

By admin | Published: February 19, 2017 3:50 AM

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना व्यावसायिक दराने पाणीबिल आकारण्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील तब्बल १४,३२५ बांधकामांना

- नामदेव मोरे, नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना व्यावसायिक दराने पाणीबिल आकारण्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील तब्बल १४,३२५ बांधकामांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. त्यामध्ये माथाडी कामगारांसह एलआयजीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा समावेश असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २०१७-१८ या वर्षासाठी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शहरातील सर्व घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. पाणीवाटपाच्या योजनेमध्ये सुसूत्रीकरण आणले जाणार असल्याचे स्पष्ट केले; पण ही एकात्मिक पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाणीबिलाचे दर वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यापुढे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींनाही नळजोडणी देण्यात येणार असून, त्यांना व्यावसायिक दर आकारले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सद्यस्थितीमध्ये बांधकाम परवानगी घेतलेल्या २६,१०५ इमारतींपैकी तब्बल १४,३२५ बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या बांधकामांमध्ये माथाडी कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ येथील माथाडी चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेकडे बांधकाम परवानगी घेतली आहे; परंतु त्या बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. कोपरखैरणेमध्ये सर्वाधिक ५९९८ घरांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. ऐरोलीमध्ये २०८० व वाशीमध्ये १७७७ इमारतींचा समावेश आहे. याशिवाय अल्पउत्पन्न गटातील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी वाढीव बांधकाम केले असून, त्यांना भोगवटा प्रमाणपत्र नाही. या सर्व बांधकामांना व्यावसायिक दराने पाणीबिल भरावे लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये माथाडी व एलआयजीमधील रहिवाशांना ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी मिळत आहे. व्यावसायिक दर आकारले तर ३० हजार लिटरसाठी ९०० रुपये बिल भरावे लागणार आहे. तब्बल १८ पट जादा बिल भरावे लागणार आहे. महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्यांना व्यावसायिक दराने बिल आकारले तर त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. जेवढा पगार नाही तेवढे पाणीबिल भरावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. पुढील वर्षीसाठी ३ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये सामान्य शहरवासीयांना फायदा होण्याऐवजी त्यांच्यावर वाढीव पाणीबिलाची संक्रात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाचे पडसाद शहरामध्ये उमटण्याची शक्यता असून याविरोधात माथाडींसह एलआयजीमध्ये राहणारे नागरिक आंदोलन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ... तर शहरवासी रस्त्यावर उतरतील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना व्यावसायिक दराने पाणीबिल आकारले तर सर्वसामान्य शहरवासीयांचे बजेट कोलमडणार आहे. वाढीव बिल भरणे अशक्य असल्याने या निर्णयाविरोधात माथाडी कामगारांसह एलआयजीमध्ये राहणारे नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता असून आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार की करवाढीचा विचार थांबविणार याकडे सर्र्वांचे लक्ष लागले आहे. माथाडी कामगारांना सिडकोने दिलेली घरे अत्यंत लहान होती. गरजेपोटी कामगारांनी त्यांच्या मूळ घराच्या जागेवर परवानगी घेऊन बांधकाम केले आहे; पण फक्त भोगवटा प्रमाणपत्र नाही म्हणून जर व्यावसायिक दर आकारण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल. कोणत्याही स्थितीमध्ये पाणीबिल वाढवून दिले जाणार नाही. - शंकर मोरे, नगरसेवक, कोपरखैरणे