शेतक-यांना माथाडींचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांनी केले कष्टकरी कामगारांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:01 AM2017-09-21T03:01:22+5:302017-09-21T03:01:30+5:30

राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

Mathadi's help hand to farmers, applauded by the Chief Minister | शेतक-यांना माथाडींचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांनी केले कष्टकरी कामगारांचे कौतुक

शेतक-यांना माथाडींचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांनी केले कष्टकरी कामगारांचे कौतुक

Next

नवी मुंबई : राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे स्वागत केले असून, ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.
राज्यातील असंघटित हमाल व कष्टकरी कामगारांना एकत्र आणून त्यांच्यासाठी कायदा बनविण्यास सरकारला भाग पाडण्यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची महत्त्वाची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील यांनी राज्यातील माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. कामगारांना घरे व उपचारासाठी स्वत:चे रुग्णालय सुरू करण्यात आले. राज्यातील माथाडी कामगारांनीही त्यांना मिळालेल्या कष्टाच्या मोबदल्यातील काही वाटा संकटग्रस्तांना देण्याची परंपरा कायम राखली आहे. राज्यात भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ व इतर कोणतेही नैसर्गिक संकट असले की, सर्वात प्रथम धावून जातो तो माथाडी कामगारच. मुंबईतील १९९३मधील बॉम्बस्फोटानंतर सर्वप्रथम जनजीवन सुरळीत करण्यामध्येही माथाडी कामगारांचा मोठा वाटा होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही माथाडींमुळेच दुसºया दिवशी जनजीवन सुरळीत झाल्याचे अनेक वेळा भाषणांमध्ये सांगितले आहे. कामगारांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकºयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकºयांना मदत करता यावी, यासाठी कामगारांनी एक दिवसाचे वेतन दिले आहे. ३० लाख रुपयांचा निधी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
माथाडी कामगारांनी केलेल्या मदतीचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे. कष्टकरी कामगारांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी देणे ही इतरांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. अशाप्रकारे प्रत्येक नागरिकाने मदतीचा हात पुढे केला, तर प्रत्येक संकटग्रस्तांना आधार देणे सहज शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
माथाडी नेत्यांनीही कामगारांनी आतापर्यंत सामाजिक जाणिवेमधून काय केले, याविषयी माहिती दिली. माथाडी कामगारही शेतकरीच असून, बहुतांश कामगार शेती व्यवसायाशी संबंधित उद्योगामध्ये कार्यरत आहेत. यामुळेच शेतकºयांच्या मदतीसाठी कामगार नेहमीच पुढे येत असल्याचे सांगितले.
या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप, एकनाथ जाधव, गुंगा पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
>कामगारांना २५०० घरांचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरामध्ये माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. वडाळा येथील गृहप्रकल्प पूर्ण होण्यामधील अनेक अडथळे दूर केले आहेत. याशिवाय अजून २५०० घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. वडाळामधील गृहप्रकल्पांसाठी जादा चटईक्षेत्र देता येईल का, याविषयी चाचपणी करण्यात येणार आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, शक्य तितक्या लवकर घरांसह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले असल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
माथाडी कामगारांनी राज्यातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकºयांसाठी एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांनी दिलेला ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
- नरेंद्र पाटील,
माथाडी नेते

Web Title: Mathadi's help hand to farmers, applauded by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.