माथेरानमध्ये पाणी असून दुष्काळ

By admin | Published: July 4, 2017 07:08 AM2017-07-04T07:08:42+5:302017-07-04T07:08:42+5:30

पाणी हे जीवन आहे, असे म्हटले जाते; परंतु माथेरानमध्ये परिस्थिती उलट होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गेले दोन दिवस माथेरानमध्ये

Matheran has water in drought | माथेरानमध्ये पाणी असून दुष्काळ

माथेरानमध्ये पाणी असून दुष्काळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : पाणी हे जीवन आहे, असे म्हटले जाते; परंतु माथेरानमध्ये परिस्थिती उलट होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गेले दोन दिवस माथेरानमध्ये पाणीपुरवठा न केल्यामुळे पाणी असूनही दुष्काळ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक वळचणीचे पाणी पीत आहेत.
माथेरानमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा तेथील शार्लाेट लेक व नेरळ कुंभे येथून होतो. मात्र, रविवारी व सोमवारी माथेरानमधील नागरिकांना पाणीपुरवठा केला नाही. येथे ३० जूनपर्यंत ११०७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील शार्लोट लेक तुडुंब भरून वाहत आहे. याच लेकमधून माथेरानच्या नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो; परंतु प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागरिक चक्क वळचणीचे पाणी पीत आहेत. नागरिक इतका त्रास सहन करूनही जीवन प्राधिकरण याचे गांभीर्य घेत नसून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माथेरानमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनीची धूप होऊन पाइपवर येऊन पाण्याच्या लोंढ्यामुळे दोन पाइपाला जोडणाऱ्या कपलिंग तुटल्यामुळे नेरळ कुंभे येथील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे, तसेच माथेरानमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने, तसेच पाणी गढूळ झाल्यामुळे चिखल पाइपांमध्ये गेल्यामुळे माथेरानचा पाणीपुरवठा सुरू होऊ शकत नाही.
- किरण शानबाग, अभियंता, माथेरान विभाग

गेले दोन दिवस आम्हा नागरिकांना पाणी मिळाले नाही. पाणी न मिळाल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आम्हा गृहिणींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवकसुद्धा हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहेत, त्यामुळे आम्ही दाद कोणाकडे मागावी. - नंदा कदम, गृहिणी

Web Title: Matheran has water in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.