माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्ववत सुरू ठेवा

By admin | Published: May 13, 2016 02:39 AM2016-05-13T02:39:28+5:302016-05-13T02:39:28+5:30

माथेरान येथील ब्रिटिशकाळापासून असलेल्या व पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन रेल्वे सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Matheran mintrain services continue to undo | माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्ववत सुरू ठेवा

माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्ववत सुरू ठेवा

Next

नेरळ : माथेरान येथील ब्रिटिशकाळापासून असलेल्या व पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन रेल्वे सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मिनीट्रेनची सेवा पूर्ववत चालू ठेवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (११ मे) संसदेत प्रश्न उपस्थित केला व रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चाही केली. यावेळी माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्वपदावर येण्यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले.
नेरळ - माथेरान या मार्गावर ब्रिटिशांनी पुणे व मुंबई शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माथेरानला त्यावेळी थंड हवेचे ठिकाण घोषित करून पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यात आला. ही मिनीट्रेन सेवा सुरू झाली त्याला आज ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खऱ्या अर्थाने माथेरान हे प्रकाशझोतात आले आहे.
एखादी अपवादात्मक घटना वगळता या मिनी ट्रेनची सेवा अखंड चालू आहे. परंतु मागील दोन वर्षापासून या गाडीच्या सेवेला ग्रहण लागले आहे. अमन लॉज रेल्वे स्थानकाजवळील भागात एकाच आठवड्यात ही मिनीट्रेन दोन वेळा
रुळावरून घसरल्यामुळे ही सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते.
माथेरानचे प्रमुख आकर्षण ही छोटी टॉयट्रेन आहे. देश-विदेशातून पर्यटक खास करून याच सफरीत रममाण होण्यासाठी नियमितपणे येत असतात. मुंबईच्या लोकलप्रमाणेच माथेरानकरांच्या उदरनिर्वाहाची ही लाइफलाइन बनली आहे.
माथेरानच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण बाब असून ही मिनी ट्रेन पूर्ववत सुरू ठेवावी असा मुद्दा खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उपस्थित केला व त्याचबरोबर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन ही मिनीट्रेन सुरू ठेवावी याबाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी व संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, कैलाश चौधरी आदींनी यावेळी माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्वपदावर येण्यासंदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिले. (वार्ताहर)

Web Title: Matheran mintrain services continue to undo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.