माथेरान पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण
By admin | Published: April 20, 2017 03:41 AM2017-04-20T03:41:58+5:302017-04-20T03:41:58+5:30
नोकरीनिमित्त माथेरानमधील हॉटेलमध्ये काम करत असलेल्या वृद्धाला माथेरानमधील पोलिसांनी जीवदान देऊन आपण कर्तव्याशी प्रामाणिक आहोत हे दर्शवून दिले.
माथेरान : नोकरीनिमित्त माथेरानमधील हॉटेलमध्ये काम करत असलेल्या वृद्धाला माथेरानमधील पोलिसांनी जीवदान देऊन आपण कर्तव्याशी प्रामाणिक आहोत हे दर्शवून दिले.
गिरीश त्रिकमदास रावसिया (६६, रा.बदलापूर) असे या वृद्धाचे नाव आहे. माथेरान येथील अलेक्झेंडर पॉइंट येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात रावसिया हे सोमवारी रात्री ८ वाजता मूर्च्छित अवस्थेत पडलेले स्थानिक नागरिक सीताराम भोसले यांना दिसले. त्यांनी वेळ न दवडता पोलिसांना फोनवर माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी येऊन त्या वृद्धास पाहिले त्याच्या अंगावर मुंग्या वळवळ करीत होत्या म्हणून पोलिसांना वाटले की हा वृद्ध मृतावस्थेत आहे. त्याच्या तोंडावर पाणी मारले असता थोडी हालचाल पाहून झोळी बनवून तत्काळ माथेरानमधील बी.जे. रुग्णालयात आणले असता डॉ.तांबे यांनी त्वरित जे.जे. रु ग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी १०८ ला फोन लावून रु ग्णवाहिकेला पाचारण केले आणि जे.जे.रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या परिवाराची चौकशी करताना पोलिसांना अपयश येत होते म्हणून पोलिसांनी हॉटेल्समध्ये तपास सुरू केला असता माथेरानमधील बाईक हॉटेल येथे ही व्यक्ती लेखापाल म्हणून गेली चार वर्षे काम करीत होती आणि सध्या तो पॅरामाउंट हॉटेल येथे कार्यरत होता. माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, पोलीस नाईक रूपेश नागे, कौशिक फेंगडू, पोलीस शिपाई बाबासाहेब जाधव, अण्णासाहेब मेटकरी, दत्तात्रय किसवे यांनी आपले कर्तव्य बजावले. (वार्ताहर)