माथेरानमध्ये बांधकाम तोडण्यास जोरदार विरोध

By Admin | Published: February 8, 2017 04:27 AM2017-02-08T04:27:39+5:302017-02-08T04:27:39+5:30

हरित लवादाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश दिल्यानंतर माथेरानमधील भूमिपुत्रांची झोप उडाली आहे. या आदेशान्वये माथेरानमधील कारवाईला सुरवात झाली

Matheran strongly opposes the construction | माथेरानमध्ये बांधकाम तोडण्यास जोरदार विरोध

माथेरानमध्ये बांधकाम तोडण्यास जोरदार विरोध

googlenewsNext

अजय कदम, माथेरान
हरित लवादाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश दिल्यानंतर माथेरानमधील भूमिपुत्रांची झोप उडाली आहे. या आदेशान्वये माथेरानमधील कारवाईला सुरवात झाली त्यामुळे माथेरानमधील वातावरण तापले होते. नगरपरिषदेच्या कारवाईच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केल्यामुळे माथेरानमध्ये तणावपूर्ण वातावरणाची स्थिती आहे.
हरित लवादाने २००३ नंतरची बांधकामे त्वरित हटवून त्याचा अहवाल २२ फेब्रुवारीपर्यंत लवादास सादर करावा असे आदेश दिल्यामुळे नगरपरिषदेने कारवाई करण्यास
सुरुवात केली. मंगळवारी सकाळपासून माथेरानकरांनी आपली दुकाने, हॉटेल्स, लॉज, घोडे, हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसेच सकाळी ८ वाजल्यापासून एकत्र जमण्यास सुरु वात झाली.
सर्व माथेरानकर माथेरानचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राम चौकात येऊन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची वाट पाहू लागले. त्याच वेळेस पोलिसांनी आपला मार्च काढून शक्तिप्रदर्शन केले. शेवटी १२.३० वाजता मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप येत असल्याचे स्थानिकांना समजले त्यामुळे सर्व स्थानिक घोषणा देत इंदिरा नगरच्या दिशेने निघाले. इंदिरा नगरच्या प्रवेशद्वारातच मुख्याधिकाऱ्यांची भेट झाली, परंतु मुख्याधिकाऱ्यांनी स्थानिकांची भेट नाकारली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. शेवटी रिगल हॉटेल येथे पाच मिनिटे वेळ देऊन त्यांनी कारवाईला सुरु वात केली. त्यावेळेस पोलीस व स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळे वातावरण शांत होऊन कारवाईस सुरुवात झाली. स्थानिकांनी कारवाई थांबविण्यासाठी अधिकारी, पोलिसांकडे विनंती के ली, मात्र न्यायालयाच्या आदेशापुढे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.

आम्ही सर्वसामान्य नागरिक, माथेरानमध्ये शेती करू शकत नाही. कंपन्या नाहीत त्यामुळे नोकरी सुद्धा करू शकत नाही. इथे येणाऱ्या पर्यटकांवर आमचा उदरनिर्वाह चालतो आहे. हात रिक्षा ओढून रक्ताचं पाणी करून आम्ही एक एक पैसा जमा करून घर बांधतो पण हे स्वत:ला पर्यावरणवादी समजणारे एसीत बसून लोकांना सतावत असतात. झाडे लावण्यास ही मंडळी येथे कधी येत नाहीत, ना झाडाची जोपासना करण्यास. पर्यावरणास आम्हीच जपतो मग हे पर्यावरणवादी आम्हास नाहक त्रास का देतात?
- प्रकाश सुतार,
सचिव, श्रमिक रिक्षा संघटना

Web Title: Matheran strongly opposes the construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.