उन्हाळी सुट्ट्यांमुळे माथेरानचा परिसर बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:02 AM2018-04-16T07:02:33+5:302018-04-16T07:02:33+5:30

राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.

 Matheran's area will grow due to summer holidays | उन्हाळी सुट्ट्यांमुळे माथेरानचा परिसर बहरणार

उन्हाळी सुट्ट्यांमुळे माथेरानचा परिसर बहरणार

googlenewsNext

- मुकुंद रांजाणे
माथेरान  - राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
रेल्वे प्रशासनाने अमनलॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेच्या फेऱ्यांत वाढ केल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यातच सध्या नियमितपणे नेरळहून सकाळी एक मिनीट्रेन पहाटे ६ वाजून ४० मिनिटांनी, तर दर शुक्र वारी ९ वाजता सुटणार आहे. त्यामुळे याचाही लाभ अनेकांना घेता येणार आहे. नगरपालिका प्रशासनानेही पर्यटकांच्या करमणुकीसाठी लवकरच नौरोजी उद्यानात आॅर्केस्टाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, जागोजागी स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेच्या कामगारांना नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी ठेकेदारामार्फत सूचना दिलेल्या आहेत. पॉइंट्सच्या सुशोभीकरणाकडे नगरपालिकेची वाटचाल दिसत असून, एकंदरच पर्यटकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झालेले आहे. शनिवार आणि रविवार नियमितपणे पर्यटकांची गर्दी असतेच; परंतु अन्य दिवशीसुद्धा पर्यटक भरपूर प्रमाणात येऊन इथल्या स्थानिकांच्या व्यवसायात भर पडावी, या दृष्टीने व्यापारीवर्गासह लहान-मोठ्या व्यावसायिक यांनी दुकाने आकर्षक सजविली आहेत. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेरान येथे हॉटेल्स, लॉजिंग स्वस्त दरात उपलब्ध आहेत. माथेरान हे मुंबई-पुण्यापासून जवळचे एकमेव पर्यटनस्थळ असल्याने ते पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

Web Title:  Matheran's area will grow due to summer holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.