शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

उन्हाळी सुट्ट्यांमुळे माथेरानचा परिसर बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 7:02 AM

राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.

- मुकुंद रांजाणेमाथेरान  - राज्यभर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती दिली आहे. माथेरानमध्यही पर्यटकांची संख्या वाढू लागली असून, त्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.रेल्वे प्रशासनाने अमनलॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवेच्या फेऱ्यांत वाढ केल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यातच सध्या नियमितपणे नेरळहून सकाळी एक मिनीट्रेन पहाटे ६ वाजून ४० मिनिटांनी, तर दर शुक्र वारी ९ वाजता सुटणार आहे. त्यामुळे याचाही लाभ अनेकांना घेता येणार आहे. नगरपालिका प्रशासनानेही पर्यटकांच्या करमणुकीसाठी लवकरच नौरोजी उद्यानात आॅर्केस्टाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, जागोजागी स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेच्या कामगारांना नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी ठेकेदारामार्फत सूचना दिलेल्या आहेत. पॉइंट्सच्या सुशोभीकरणाकडे नगरपालिकेची वाटचाल दिसत असून, एकंदरच पर्यटकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झालेले आहे. शनिवार आणि रविवार नियमितपणे पर्यटकांची गर्दी असतेच; परंतु अन्य दिवशीसुद्धा पर्यटक भरपूर प्रमाणात येऊन इथल्या स्थानिकांच्या व्यवसायात भर पडावी, या दृष्टीने व्यापारीवर्गासह लहान-मोठ्या व्यावसायिक यांनी दुकाने आकर्षक सजविली आहेत. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेरान येथे हॉटेल्स, लॉजिंग स्वस्त दरात उपलब्ध आहेत. माथेरान हे मुंबई-पुण्यापासून जवळचे एकमेव पर्यटनस्थळ असल्याने ते पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड